तपास यंत्रणांना राजकीय कामे सोपविल्यास हे होणारच : आझम खान

‘आपल्या ज्या काही यंत्रणा आहेत मग त्यामध्ये गुप्तचर यंत्रणाही असतील त्यांच्यावर राजकीय कामांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काहीजण ममता बॅनर्जींचा तपास करत आहेत तर काहीजण रॉबर्ट वड्रा आणि अखिलेश यादव यांचा तपास करण्यात व्यस्त आहेत’, असं आझम खान यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, ‘जेव्हा तपास यंत्रणांकडून त्यांचं मूळ काम काढून घेतलं जातं, आणि राजकीय काम सोपवलं जातं. तेव्हा वाईट गोष्टी होणारच’.
देशातील सुरक्षा यंत्रणांना फक्त ममता बॅनर्जी, रॉबर्ट वड्रा आणि अखिलेश यादव यांच्यावरच लक्ष ठेवायला सांगितल्यानंतर अशा परिस्थितीत पुलवामासारखा हल्ला अपेक्षितच होता असं वक्तव्य आझम खान यांनी केलं आहे.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट असताना समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एकीकडे हल्ल्यावरुन राजकारण केलं जाऊ नये असं आवाहन वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून होत असताना आझम खान यांनी असं काही तरी होणारच होतं असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे .