मंदिरात पैसे चोरल्याचा आरोपावरून बालकाला विवस्त्र करून दिली अशी शिक्षा !!

आर्वी येथे सहा वर्षीय बालकाला विवस्त्र करून तपत्या टाइल्सवर बसविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात बालकांचा पार्श्वभाग भाजला आहे. त्याला गंभीर दुखापत झाली आहे. आर्यन खडसे असे पीडित बालकाचे नाव आहे. आर्यनवर सध्या त्याच्यावर आर्वी येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आर्वी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गजानन खडसे (रा.राणी लक्ष्मीबाई वार्ड) यांचा सहा वर्षीय मुलगा आर्यन खडसे हा नेहमीप्रमाणे जोगना माता मंदिराच्या प्रांगणात खेळायला गेला होता. तिथे आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे आला. ‘तू मंदिरातून पैसे चोरले, असे म्हणत त्याने आर्यनला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला विवस्त्र केले. त्याचे दोन्ही हातपाय बांधून मंदिराच्या आवारातील तपत्या टाईल्सवर बसविले. यात आर्यनचा पार्श्वभाग गंभीर भाजला. आर्यनला याला तातडीने सामान्य रुग्णालय हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. आर्वी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.