धक्कादायक : पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळलं !!

एका ट्रॅफिक पोलिसाने महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमधल्या अलप्पुझामध्ये ही घटना घडली. या महिलेच्या घराजवळच तिला जाळण्यात आलं. एका पोलीस अधिकाऱ्यावरच हा हल्ला झाल्याने महिला पोलीसही सुरक्षित नाहीत हेच या घटनेवरून दिसून येतं. त्यातही ज्याने नागरिकांचं संरक्षण करायचं त्या ट्रॅफिक पोलिसानेच हा हल्ला केला आहे.
सौम्या पुष्पकरन असं महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. सौम्या यांना तीन मुलं आहेत आणि त्यांचे पती परदेशात काम करतात, असं मातृभूमी या वृत्तपत्रात नमूद करण्यात आलं आहे. सौम्या या संध्याकाळी कामावरून घरी परत येत होत्या तेव्हा अजाझ नावाच्या एका ट्रॅफिक पोलिसाने कारने त्यांच्या टू व्हीलरला धडक दिली आणि त्यांना खाली पाडलं. त्यांना पाहून सौम्या यांनी एका घरात आश्रय घेतला. अझाझ तिथे धडकला आणि त्याने सौम्या यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. सौम्या पुष्पकरन यांचा जागेवरच जळून मृत्यू झाला . अजाझ हा ट्रॅफिक पोलीसही यात जखमी झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला अलप्पुझा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं आहे. अजाझ याने हा हल्ला का केला हे अजून कळू शकलेलं नाही. पोलीस आता या घटनेची चौकशी करत आहेत.