Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

किरकोळ कारणावरून तरुणाला जिवंत जाळले !! परभणी जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Advertisements
Advertisements
Spread the love

गावातील नालीच्या किरकोळ कारणावरून झालेल्या जुन्या वादातून एका तरुणास जिवंत जाळले. ही घटना सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील वालूर रस्त्यावर शनिवारी (१५ जून) सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास घडली. यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सतीश दत्तराव बरसाले (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. सतीश हा स्वत:चे ट्रॅक्टर सेलू वालूर रस्त्याने घेऊन जात असतांना काही लोकांना त्याला आडवून बेदम मारहाण केली. ट्रॅक्टर मधील डिझेल काढून सतीशच्या अंगावर टाकून भर रस्त्यावर जिवंत जाळले. सेलू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सेलू पोलीस ठाण्यात सुरू होती.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!