दिल्लीतील दहा डॉक्टर संपावर, बंगालच्या डॉक्टरांना पाठिंबा

पश्चिम बंगालमधील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या दिल्ली मेडिकल असोसिएशन (DMA) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. १७ जून रोजी होणाऱ्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्याची घोषणा या संघटनेने केली आहे. या संपाला पाठिंबा देत एम्ससह दिल्लीतील १८ हॉस्पिटलमधील १० हजारांहून अधिक डॉक्टर आज संपावर जाणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत कामावर न येण्याची अटच डॉक्टरांनी ठेवली आहे. पश्चिम बंगालमधील ७०० डॉक्टरांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. यामुळे पश्चिम बंगालमधील आरोग्यव्यवस्था कोलमडली आहे.