#News_Updates
>पुलवामा हल्ला: दक्षिण काश्मीरमधून सात संशयित जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात
>दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहीद जवानांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन
>केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहीद जवानांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन.
>जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामामध्ये सुरक्षा जवानांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी निषेध नोंदवला आहे. भारतातील जवानांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले आहेत. तसेच दहशतवादविरोधातल्या लढाईत रशिया नेहमीच भारताबरोबर असेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
>अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतातील जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले, पाकिस्तानमधून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांमुळेच अव्यवस्था, हिंसा आणि दहशतवाद वाढीस लागला आहे. या हल्ल्यात अमेरिका भारताबरोबर आहे.
>शहीद जवानांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहा; पंतप्रधान मोदींच्या भाजपाच्या मंत्री आणि खासदारांना सूचना
>औरंगाबाद: पुलवामा येथे लष्करी जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संग्रामनगर परिसरातील नागरिकांचा कँडल मार्च
>एकदा होऊ द्या आरपार ! वयोमानानुसार मला आज हत्यार पेलवणार नाही. पण जर माझी गरज पडलीच तर सीमेच्या रक्षणासाठी लढणार्या जवानांना सामग्री पुरवण्याचं काम मी आजही करीन – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
>मुंबई: पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची शिवसेनेची मागणी
>नाशिक: काँग्रेसकडून पाकिस्तानचा पुतळा दहन करत दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध
?शबाना आझमी, जावेद अख्तर यांचा पुलवामा हल्ल्यानंतर कराची येथे होणाऱ्या आर्ट परिषदेच्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय
>सोलापूर: माघी यात्रेसाठी कर्नाटकमधून आलेल्या बसला मंगळवेढ्याजवळ अपघात; ४० वारकरी जखमी