BJP News Update : महाराष्ट्र फुले, शाहू आंबेडकरांची भूमी , याच भूमीने लढायला शिकवले : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

कोल्हापूर : महाराष्ट्रच्या भूमीने देशाला लढायला शिकवल आहे. स्वराज्य कसे निर्माण करायचे याच भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले , शाहू, फुले , आंबेडकर यांची ही भूमी आहे.कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. या वेळी योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. मी लोकसभा निवडणुकीत देखील आलो होतो तुम्ही त्यांना निवडून दिलं त्याबद्दल आभार असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
योगींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला असून राज्यात सुरू असलेल्या निवडणुका केवळ सत्तेसाठी नाही, तर देशासाठी महत्वाच्या आहेत. देशात मोदी सरकार आहे, मोदींना एक भारत श्रेष्ठ भारत करायचं आहे. यासाठी राज्यात महायुती आहे, तर दुसरीकडे ना निती ना निर्णय घेण्याचं सामर्थ्य नसलेली महाविकास आघाडी आहे.
काँग्रेस आणि शरद पवार यांच्यात नुरा कुस्ती
महाविकास आघाडी राज्याला धोका देत आहे. महाविकास आघाडीत असलेले काँग्रेस आणि शरद पवार यांच्यात सध्या नुरा कुस्ती सुरू आहे. काँग्रेसचा इतिहास भारताला धोका देणार आहे. काँगेस नेतृत्वाने जर निर्णय घेतला असता तर भारत विभाजन झालं नसतं आणि पाकिस्तान तयार झाल नसता. हजारो वर्षांपासून एकत्र अखंड असलेला भारत दोन भागात काँग्रेसने विभागून टाकला, यामुळे हजारो हिंदू कापले गेले. काँग्रेस आता ते मान्य करत नाही.
काल प्रियंका गांधी येऊन गेल्या. त्या विकास, सुरक्षा, आतंकवाद, नक्षलवादवर काही बोलल्या नाहीत, कारण ते येथे तुकडे करण्यासाठी आले आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांच्यात ही खरं बोलायची हिम्मत नाही, जेव्हा मी बटेंगे तो कटेंगे म्हणतो तर त्यांना वाईट वाटतं. खरगेजी तुम्ही सत्य स्वीकारा आणि निजाम कोण होता हे सांगा, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
काँग्रेसमध्ये इंग्रजांची अनुवंशिकता
काँग्रेसमध्ये इंग्रजांची अनुवंशिकता असल्याने ते फोडण्याचं काम करत आहेत. ते आपल्याला जात धर्म भाषेवर फोडण्याचा काम करत आहेत. काँग्रेस कधीच देशहिताच नव्हतं, मात्र आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून बाजूच्या देशातील कोणीही अतिक्रमणं करण्याची हिम्मत करत नाही, त्यांना माहित आहे हा नवीन भारत आहे, कुणी छेडलं तर सोडत नाही.
हम बटे थे तब अपमान सहन करना पडता था!. अयोध्यामध्ये काँग्रेस देखील राम मंदिर बांधू शकलं असतं, पण त्यांनी बांधलं नाही. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कधी काँग्रेसबरोबर आघाडी केली असती का? पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब यांच्या मूल्यांना बाजूला करून काँग्रेसबरोबर आघाडी केली. महायुती सरकार आलं की विशाळगड अतिक्रमण आपोआप निघत. आपल्या गणेश मिरवणुकीवर कोण दगडफेक करणार नाही, त्यांना माहीत आहे, जर दगडफेक केली तर उत्तरप्रदेशचा फॉर्म्युला इथे लागू होईल, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी निशाणा साधला.