MVANewsUpdate : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर, गंगापूरमधून सतीश चव्हाण, बीडमधून संदीप क्षीरसागर

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही दुसरी यादी जाहीर केली आहे. याशिवाय तिसरी यादी पत्रकार परिषद न घेता लवकरच जाहीर केली जाणार असल्याच जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
या इच्छुकांना मिळाली उमेदवारी :
1. एरंडोल सतीश अण्णा पाटील
2. गंगापूर सतीश चव्हाण
3. शहापूर पांडुरंग बरोरा
4. परांडा राहुल मोटे
5. बीड संदीप क्षीरसागर
6. आर्वी मयुरा काळे
7. बागलान दीपिका चव्हाण
8. येवला माणिकराव शिंदे
9. सिन्नर उदय सांगळे
10. दिंडोरी सुनीता चारोस्कर
11. नाशिक पूर्व गणेश गीते
12. उल्हासनगर ओमी कलानी
13. जुन्नर सत्यशील शेरकर
14. पिंपरी सुलक्षणा शीलवंत
15. खडकवासला सचिन दोडके
16. पर्वती अश्विनीताई कदम
17. अकोले श्री अमित भांगरे
18. अहिल्या नगर शहर अभिषेक कळमकर
19. माळशिरस उत्तमराव जानकर
20. फलटण दीपक चव्हाण
21. चंदगड नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
22. इचलकरंजी मदन कारंडे