Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MahayutiNewsUpdate : महायुतीच्या तिन्हीही नेत्यांची आज अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत होते आहे बैठक….

Spread the love

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी , महाविकास आघाडी बरोबरच महायुतीतही काही जागांवरून पेच निर्माण झाला असून, यावर आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शाह यांच्या बैठकीत अंतिम तोडगा निघेल आणि त्यानंतर लवकरच महायुतीच्या जागावाटपाची लवकरच घोषणा केली जाईल, असे तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. यासंदर्भात आता महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांची आज रात्री बैठक होत आहे.

शिवसेना मुख्य नेता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. तिन्ही नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे.

यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. महायुतीतील वादाचा विषय म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. तर भाजप आपल्या मतांवर ठाम आहे . त्यासंदर्भात अमित शाहांसोबत अंतिम चर्चा होणार असल्याचे समजते. त्याचबरोबर महायुतीत काही जागांवर तिन्ही पक्षांनी तर काही ठिकाणी दोन पक्षांनी दावे केले आहेत. त्यावरही तोडगा काढण्यासंदर्भात शाह यांच्यासोबत हि बैठक होत आहे.

दरम्यान आम्ही मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आता तुम्ही आम्हाला थोड्या अधिक जागा देण्यासाठी त्याग करा अशी भूमिका भाजपनेते अमित शाह यांनी घेतल्याचे समजताच शिंदे यांच्या आमदारांनी आम्हीही त्याग केला त्यामुळे महायुतीची सत्ता आली हे विसरू नका याची आठवण करून दिली त्यामुळे चर्चेतून मार्ग काढण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला आहे .

या विषयावरून अधिक वाद न वाढवता लवकर जागावाटप निश्चित करून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याचे प्रयत्न महायुतीकडून सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीतही महायुतीतील जागावाटप प्रचंड रेंगाळले होते . त्याचा फटकाही मतदारसंघात बसला. ही चूक टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील दोन दिवसांत महायुतीतील पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली जाऊ शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!