केजरीवाल यांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा , आणि निवाडणूक आयोगाची भूमिका ….

नवी दिल्ली : पुढील वर्षी दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. यादरम्यान केजरीवाल यांनी महाराष्ट्र आणि झारखंडसह दिल्ली विधानसभा निवडणुकाही नोव्हेंबरमध्ये घ्याव्यात, अशी मागणी केली आहे. मात्र, आता निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, सध्या दिल्लीत वेळेपूर्वी निवडणुका घेण्याची शक्यता नाही. कारण, इतक्या कमी कालावधीत विधानसभा निवडणुका लवकर घेणे शक्य नाही.
नोव्हेंबरमध्येच दिल्ली विधानसभा निवडणुका घ्या…
तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या भाषणात म्हणाले, ‘जर तुम्हाला वाटत असेल की मी प्रामाणिक आहे, तर मला मोठ्या संख्येने मतदान करा. आता निवडून आल्यानंतरच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाकडे मागणी करत केजरीवाल म्हणाले की, नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीसोबत दिल्लीतही निवडणुका घ्याव्यात, निवडणुका होईपर्यंत पक्षातील दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री राहील. येत्या दोन-तीन दिवसांत आमदारांची बैठक होणार असून, त्यात पुढील मुख्यमंत्र्यांचा निर्णय होणार आहे.
वास्तविक, निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नाहीत, परंतु हरियाणा याआधीच जाहीर केल्या आहेत.
राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले…
तुरुंगातून सुटल्यानंतर 2 दिवसांनी अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात केलेल्या भाषणात मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, आजपासून दोन दिवसांनी मी राजीनामा देणार आहे. केजरीवाल म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा राजीनामा देणार आहे आणि जोपर्यंत जनता निर्णय देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.” केजरीवाल म्हणाले, “मी लोकांमध्ये जाईन, प्रत्येक रस्त्यावर जाईन, प्रत्येक घरात जाईन आणि जोपर्यंत जनता केजरीवाल प्रामाणिक असल्याचा निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.”