Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ParliamentNewsUpdate : पहिल्याच दिवशी विरोधकांनी दणाणून सोडला संसद परिसर , मोदींसहित सर्वांनीच घेतली खासदारपदाची शपथ…

Spread the love

नवी दिल्ली : आजपासून १८ लोकसभेच्या संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली . सकाळच्या सत्रात नियोजित केल्याप्रमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षमंत्री राजनाथ सिंह, रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर, एच. डी. कुमारस्वामी, पीषुय गोयल, जीतन राम मांझी, धरमेंद्र प्रधान यांच्यासह अनेक नेत्यांनी घेतली खासदारकीची शपथ घेतली. तर संसदेबाहेर विरोधकांनी संविधानावरील आक्रमण म्हणीत आंदोलन केले.

दरम्यान, या निमित्ताने सभागृहात आणि सभागृहाबाहेर अनेक घटना घडल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी ससदेबाहेर हातात संविधानाच्या प्रती घेऊन घोषणाबाजी केली. तसेच आम्ही देशाची लोकशाही आणि संविधान टिकवून ठेवू असा विश्वास व्यक्त केला. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा लोकशाही आणि संविधानाला धोका असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांमधील सर्व खासदार संविधानाच्या प्रती घेऊन संसदेत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारकीची शपथ घेतली तेव्हा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदींना संविधानाची प्रत दाखवली. खासदारांचा शपथविधी सुरू झाल्यानंतर लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांनी नरेंद्र मोदींना शपथ घेण्यासाठी पाचारण केलं. मोदी त्यांच्या बाकावरून उठून मंचाकडे जात असताना आणि शपथ घेत असताना राहुल गांधी यांनी हात उंचावून त्यांना संविधानाची प्रत दाखवली. राहुल गांधी यांच्या हातात लाल रंगाची संविधानाची मिनी कॉपी होती. मोदींची शपथ पूर्ण होईपर्यंत विरोधी पक्षांचे खासदारही त्यांना संविधानाची प्रत दाखवत होते.

आज दिवसभरातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी…

भाजपाच राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची राज्यसभेच्या सभागृहनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभेच्या सभागृहात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान शपथ घेण्यासाठी उभे राहिल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी ‘NEET…NEET…’ अशी घोषणाबाजी सुरू केली.

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी सर्व विजयी खासदारांचं मी अभिनंदन करताना , मला आशा आहे की ही संसद लोकशाही टिकवेल. या निवडणुकीत जो तिरस्कार आणि घृणा समाजात पसरवली गेली होती ती नष्ट होईल, अशी मी अपेक्षा करतो. देशातलं सरकार कुबड्यांर आहे, तर त्यांच्यासमोर एक मजबूत विरोधी पक्ष उभा आहे असे उद्गार काढले.

“रस्सी जल गई, बल नहीं गया”, मल्लिकार्जुन खर्गेंचा पंतप्रधान मोदींना टोला

सभागृहाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केल्यानंतर विरोधी पक्षाकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये खर्गे यांनी म्हटलं आहे की मोदीनी त्यांच्या भाषणात त्यांचे customary (नेहमीचे) गरजेपेक्षा अधिक वापरले. रस्सी जल गई, पर बल नहीं गया.

भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांनी मोदींना खासदारकीची शपथ दिली. त्यानंतर भाजपा खासदार राधा मोहन सिंह यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या पॅनेलमधील सदस्य म्हणून शपथ घेतली. भाजपा खासदार फग्गन सिंह कुलस्ते आणि राधा मोहन सिंह पुढील दोन दिवस सभागृहाच्या कामकाजात हंगामी अध्यक्षांची मदत करतील.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांची घटनेच्या कलम ९५ (१) अन्वये लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. हंगामी अध्यक्षाची काही महत्त्वाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी निवड केली जाते.

इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी हातात संविधान घेऊन एकीचं बळ दाखवण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व खासदार संसदेत एकत्र प्रवेश केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!