मुंबई पोलिसांनी व्हॅनमधून जप्त केली तब्बल 4 कोटी 70 लाखांची कॅश …

मुंबई : मुंबई पोलिसांनी पवई परिसरात नाकाबंदी करत एका व्हॅनमधून तब्बल 4 कोटी 70 लाखांची कॅश पकडली आहे. पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या कॅशचा बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला त्यामुळे ही रक्कम नेमकी कुणाची आहे याच तपास चालू आहे.
दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत सायनमध्ये 1 कोटी 87 लाख 80 हजार रुपये तर भांडुपमध्ये 3 कोटी 93 लाख रुपयांहून अधिक संशयित रक्कम जप्त करत पोलिसांनी कारवाई केली होती. याशिवाय, घाटकोपरमध्ये 72 लाखांची रोख रक्कम सापडली होती.
या कारवाया ताज्या असतानाच पवई पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कॅश व्हॅनमधून 4 कोटी 70 लाख रुपये घेऊन जात असताना जप्त केली आहे. परवा रात्री पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदीमध्ये कॅश व्हॅन जात असताना पवई पोलिसांनी गाडीला थांबून चौकशी केली असता, पवई पोलिसांनी 4 कोटी 70 लाख रुपये कॅश व्हॅनमधून जप्त केले आहेत.
दरम्यान पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिल्यानंतर निवडणूक अधिकारी त्या कॅशच्या बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला. यानंतर आयकर विभागाने या कॅश आणि गाडी आपल्या ताब्यात घेऊन ही रोकड कुठून आणली आणि एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की, निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता का? या संदर्भात अधिक तपास आयकर विभाग करत आहे. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. पवई पोलिसांनी आता रोकड जप्त केली आहे.