Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : अखेर अमेठी आणि रायबरेलीचे काँग्रेसचे उमेदवार जाहीर …

Spread the love

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या क्षणी काँग्रेसने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही नावांची यादी आज जाहीर केली आहे.

काँग्रेससाठी अत्यंत महतवाच्या असलेल्या या जागांसाठी कोण उमेदवार असणार यावरून चर्चा रंगली होती. यात अमेठीमधून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाढरा यांचेही नाव चर्चेत होते तर प्रियांका गांधी रायबरेलीतून आपल्या आईच्या जागेवर लढतील असेही अटकळ बांधली जात होती परंतु या या चर्चांना विराम देत काँग्रेसने अमेठीत स्मृती इराणी यांच्या विरोधात रायबरेलीमध्ये केएल शर्मा यांना तिकीट दिले आहे. तर राहुल गांधी यांचे नाव रायबरेलीतून घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान राहुल गांधी हे वायनाड व्यतिरिक्त कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवण्यास तयार नव्हते पण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्यास राजी केले आहे. भाजप आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी अनेक दिवसांपासून राहुल गांधींवर अमेठीतून पळून जात असल्याचा आरोप करत होत्या. या दोन्ही जागांसाठी आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

रायबरेलीमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे दिनेश प्रताप सिंह आहेत. त्यांचा २०१९ च्या निवडणुकीत सोनिया गांधी यांच्याकडून पराभूत झाला होता. गुरुवारी दुपारी भाजपने योगी सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांना रायबरेलीमधून उमेदवारी दिली आहे. सोनिया गांधींच्या विरोधात गेल्या निवडणुकीत दिनेश प्रताप सिंह यांना मिळालेली मते आतापर्यंत सोनिया गांधींच्या विरोधात लढलेल्या सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक होती. या लोकसभेलाही राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात त्यांनी २०१९ मध्ये विजय मिळवला होता आणि यावेळीही ते निवडणूक लढवत आहेत.

प्रियांका गांधी यांची प्रतिक्रिया

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केएल शर्मा यांना अमेठीमधून तिकीट दिल्यावर आनंद व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत येथून विजय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रियंका गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “आमच्या कुटुंबाचे किशोरी लाल शर्मा यांच्याशी दीर्घकाळाचे नाते आहे. अमेठी आणि रायबरेलीच्या लोकांच्या सेवेत ते नेहमी तत्पर असायचे. लोकसेवेची त्यांची तळमळ हे एक उदाहरण आहे.

त्या पुढे म्हणाल्या की , “आज ही आनंदाची बाब आहे की काँग्रेसने किशोरी लाल यांना अमेठीतून उमेदवार केले आहे. किशोरीलाल यांची कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण या निवडणुकीत त्यांना नक्कीच यश मिळवून देईल. खूप खूप अभिनंदन.” आमच्या कुटुंबाचे किशोरी लाल शर्मा जी यांच्याशी दीर्घकाळाचे नाते आहे. अमेठी आणि रायबरेलीच्या लोकांच्या सेवेत ते नेहमी तत्पर असायचे. लोकसेवेची त्यांची तळमळ हे एक उदाहरण आहे. “आज ही आनंदाची बाब आहे की काँग्रेसने किशोरी लाल यांना अमेठीतून उमेदवार केले आहे. किशोरीलाल यांची कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण या निवडणुकीत त्यांना नक्कीच यश मिळवून देईल. खूप खूप अभिनंदन.”

खरेतर, शुक्रवारी (3 मे) सस्पेन्स संपवून काँग्रेसने राहुल गांधींना रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा केली. किशोरीलाल शर्मा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!