Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Update : खैरेंविरुद्ध कोण ? अखेर महायुतीचा औरंगाबादचा उमेदवार ठरला, 25 एप्रिलला दाखल करणार उमेदवारी….

Spread the love

औरंगाबाद : महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा वाद मिटलेला नाही. दरम्यान महायुतीतत नाशिक, पालघर, ठाणे, दक्षिण मुंबई या जागांवर अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबादचाही समावेश होता, परंतु या जागेवर आता महायुतीकडून एकनाथ शिंदे गटाचे संदिपान भुमरे यांचे नाव निश्चित झाले असून आता खैरे विरुद्ध भुमरे असा सामना रंगणार आहे. संदिपान भुमरे 25 एप्रिल रोजी भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

महाविकास आघाडीने याआधीच औरंगाबादसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली असून या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खैरे यांना तिकीट मिळाल्यानंतर महायुतीकडून भाजपने या जागेवर दावा ठोकला होता. परंतु ही जागा शिवसेनेकडे असल्याने शिंदे गट  ही जागा सोडायला तयार नव्हता त्यामुळे उमेदवार ठरत नव्हता. त्यात गृहमंत्री अमित शाह यांनी औरंगाबादवरून कमळ निवडून पाठवा असे जाहीर सभेत सांगितल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. त्यासाठी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी तयारी सुरू केली होती मात्र शिंदे गटाने बाजी मारत ही जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले आहे.

दरम्यान, आता संदिपान भुमरे यांच्या नावावर मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले असल्याने दोन शिवसैनिक या निमित्ताने आमने सामने लढणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भुमरे  २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दुसरीकडे या दोघांचीही विद्यमान खासदार एमआयएमचे इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांच्याशीही लढत होणार आहे.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!