IndiaNewsUpdate : नरेन्द्र मोदी नंतर या नेत्याला पंतप्रधान म्हणून पसंती ….

नवी दिल्ली : केंद्राच्या सत्तेची हॅट्ट्रिक करण्यासाठी अब की बार ४०० पार ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परंतु नरेंद्र मोदींनंतर सर्वाधिक पसंती कुणाला? याचा शोध घेण्यासाठी नेटवर्क18 ने केलेल्या एका ओपिनियन पोलनुसार, सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 59 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी सर्वात सक्षम चेहरा म्हणजे नरेंद्र मोदी असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस नेते राहुल गांधी आहेत. या सर्व्हेनुसार, 21 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी सक्षम असल्याचे म्हटले आहे. या बाबतीत राहुल गांधी यांची लोकप्रियता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत 38 टक्के कमी असली तरी दुसरा चेहरा म्हणून राहूल गांधी यांची निवड केली आहे.
या शिवाय या सर्व्हेमध्ये सहभागी 9 टक्के लोकांनी तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बनर्जी आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान पदासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. या मेगा ओपिनियन पोलमध्ये 21 प्रमुख राज्यांच्या 518 लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता. 12 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला. अर्थात एकूण 95 टक्के लोकसभा मतदारसंघांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.
ओपिनियन पोलनुसार, राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागांपैकी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 77 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधी I.N.D.I.A. ला केवळ 2 जागा मिळू शकतात. तसेच, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला केवळ एक जागा मिळू शकते.