IndiaNewsUpdte : मध्य प्रदेशात निवडणूक निकाला आधीच मतपेट्या उघडल्या , अधिकारी निलंबित …

बालाघाट : संपूर्ण देशाचे लक्ष राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या राज्यांच्या निवडणूक निकालाकडे लागले आहे. सध्या तेलंगणामधील मतदान अंतिम टप्प्यात असून ३ डिसेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. मात्र, त्याच्या सहा दिवस आधीच मध्य प्रदेशातील एका केंद्रावर मतपेट्या उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे.
मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील हा व्हिडीओ असून त्यात निकाल लागण्याच्या सहा दिवस आधी म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजीच स्थानिक तहसील कार्यालयातील स्ट्राँग रुम उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसकडून या प्रकाराचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेलाच बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी डाग लावला आहे. मध्य प्रदेशच्या बालाघाटचे जिल्हाधिकारी डॉ. गिरीश मिश्रांनी २७ नोव्हेंबर रोजीच स्ट्राँग रुम उघडून उमेदवारांना कल्पना न देताच मतपेट्या उघडल्या आहेत. शेवटच्या घटका मोजणारे शिवराज सिंह सरकार आणि अंधभक्तीमध्ये आकंठ बुडालले जिल्हाधिकारी लोकशाहीसाठी धोका आहेत. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सतर्क राहावे. भाजपाच्या पराभवाच्या भीतीने सैरभैर झालेलं हे सरकार आणि काही सरकारी दलाल मतं चोरण्याच्या प्रयत्नात आहेत”, असे काँग्रेसने एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे.
निर्वाचन को कलंकित करते बालाघाट कलेक्टर
मध्यप्रदेश के बालाघाट जिले के कलेक्टर डॉ. गिरीश मिश्रा ने आज 27 नवंबर को ही स्ट्रांग रूम खुलवाकर बिना अभ्यर्थियों को सूचना दिए डाक मतपत्रों की पेटियां खोल दी है।
अंतिम साँसें गिनती शिवराज सरकार और सरकार की अंधभक्ति में लीन कलेक्टर… pic.twitter.com/I1UrKmHK5B
— MP Congress (@INCMP) November 27, 2023
या काय आहे व्हिडीओमध्ये काय आहे ?
या व्हिडीओमध्ये काही लोक खाली बसून पोस्टल मतांची पाकिटं हाताळत असल्याचं दिसत आहे. शिवाय दुसरीकडे या पाकिटांचे गठ्ठे करून एका कापडी पिशवीत भरले जात आहेत. काही लोक या सगळ्या प्रकाराचं व्हिडीओ शूटिंग करत असून “आम्हाला न बोलवता, न कल्पना देता तु्म्ही परस्पर स्ट्राँग रुम कशी उघडलीत?” असा प्रशन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
दरम्यान, स्थानिक अधिकारी गोपाल सोनी यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिले आहे. “स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. स्थानिक तहसिलदार कार्यालयातील एक खोली स्ट्राँग रुम केली असून त्यातच सर्व पोस्टल मतपेट्या ठेवल्या आहेत. आमच्याकडे रोज ऑनलाईन पोस्टल बॅलेट पद्धतीने आलेल्या मतांची पाकिटे येतात. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रुम उघडण्याच आली होती. त्यानंतर सर्व पाकिटांची प्रत्येक मतदारसंघनिहाय ५० मतांच्या गठ्ठ्यामध्ये वर्गवारी करण्यात आली”, असे ते म्हणाले.