RainNewsUodate : मराठवाड्यात पाऊस परतला , मुसळधार पावसाचा इशारा

दोन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात दमदार सुरुवात
मुंबई : भारतीय हवामान खात्याने राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि पुण्यात पहाटेपासून तर विदर्भात आणि मराठवाड्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा आणि विदर्भात आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. कालपासूनच राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पुढील ४८ तासांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये पाऊस
या वर्षी नाशिक जिल्ह्यात सामाधानकाराक पाऊस न झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरला पाणी पूर्वकथा करणाऱ्या जायकवाडी धरणात गोदावरीला पाणी आले नाही त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत होती मात्र आता नाशिक शहरासह ग्रामीण भागात आणि खान्देशात गुरुवारी पावसाने हजेरी लावली. या मुळे पाण्याअभावी मान टाकू लागलेल्या पिकांनाही या पावसामुळे जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
या सोबतच राज्यात नऊ आणि दहा तारखेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे “यलो अलर्ट” देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पुढील ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. तसेच, कोकण, गोवा, मुंबई आणि पुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील ४८ तासात पाऊस तीव्र किंवा अतितीव्र पद्धतीने सक्रिय होणार आहे. तर राज्याच्या संपूर्ण विभागात विजांच्या कडकडाट आणि मेघवर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
महामुंबईमध्ये मात्र दिवसभर मुसळधार
राज्यात गुरुवारी दिवसभरात सर्वत्र पावसाचा जोर खूप नसला तरी महामुंबईमध्ये मात्र दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. ओडिशा आणि छत्तीसगड येथे असलेली चक्रिय वात स्थिती, पूर्व-पश्चिम कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रावरून येणारे वारे आणि मान्सूनचा आस मूळ स्थितीपासून दक्षिणेकडे सरकला असल्याने राज्याला फायदा होत आहे. उत्तर कोकण विभागात, उत्तर महाराष्ट्रात तसेच विदर्भामध्ये ९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे. तर मराठवाड्यात शुक्रवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी येथे सोमवार ११ सप्टेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात रविवारनंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल असा अंदाज आहे.
गस्टमधील मान्सून खंडामुळे राज्यात आता १३ टक्के पावसाची तूट आहे. कोकण-गोवा विभागात दोन टक्के पाऊस सरासरीहून अधिक आहे तर मध्य महाराष्ट्रात २४ टक्के तूट, मराठवाड्यात २२ टक्के तूट आणि विदर्भामध्ये १२ टक्के तूट आहे. राज्याकडे ऑगस्टमध्ये पाठ फिरवलेला पाऊस दहीहंडीच्या मुहूर्तावर सक्रिय झाला आहे. मुंबईसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. राज्यात गुरुवारी दिवसभरात सर्वत्र पावसाचा जोर खूप नसला तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये मात्र गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली.