Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AdharNewsUpdate : आधार कार्ड अद्याप अपडेट केले नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे …

Spread the love

नवी दिल्ली : यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने आता ते मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली जात आहे. यापूर्वी, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 जून 2023 निश्चित करण्यात आली होती, परंतु ती 14 सप्टेंबरपर्यंत तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा UIDAI नं ही सुविधा 14 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, हे काम करण्यासाठी शुल्क आहे, पण UIDAI ने मार्चच्या शेवटच्या महिन्यात ते विनामूल्य ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे आता तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत तुमचं आधार कार्ड विनामूल्य अपडेट करु शकणार आहात. UIDAI नं अधिसूचना जाहीर करत म्हटलं आहे की, सरकार अधिकाधिक लोकांना त्यांची आधार कागदपत्रे अपडेट करण्यासाठी अतिरिक्त तीन महिन्यांची मुदत देत आहे आणि हे काम आता 14 डिसेंबरपर्यंत My Aadhaar पोर्टलद्वारे विनामूल्य अपडेट केलं जाऊ शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे, UIDAI नं आधार कार्ड धारकाला नावनोंदणीच्या तारखेपासून 10 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यात दिलेली कागदपत्रं पुन्हा एकदा अपडेट करण्यास सांगितलं आहे. हे काम घरात बसूनही अगदी सहज पूर्ण करता येणार आहे.

माय आधार पोर्टलमार्फत कसं कराल अपडेट?

https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉगइन करा.
लॉगइन केल्यानंतर ‘नाव/लिंग/जन्मतारीख आणि पत्ता अपडेट’ ऑप्शनवर क्लिक करा.
जर आधार कार्डावरील पत्ता अपडेट करायचा असेल, तर Update Address पर्याय निवडा.
त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी टाकून पुढा जा.
डॉक्युमेंट अपडेटचा पर्याय निवडा. आता तुम्हाला तुमच्यासमोर तुमचे आधार डिटेल्स दिसतील.
स्क्रिनवर दिसणारे डिटेल्स चेक करुन व्हेरिफाय करा आणि पुढे जा.
त्यानंतर तुम्हाला अॅड्रेस प्रूफसाठी अॅड्रेस प्रूफची कॉपी अपलोड करा.
आता आधार अपडेट झाल्यानंतर 14 नंबर्स असलेला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) जनरेट होईल.
या नंबर मार्फत तुम्ही तुमच्या आधारमध्ये केलेले बदल ट्रॅक करु शकता.

‘या’ कामासाठी द्यावं लागेल शुल्क…

दरम्यान, आत्तापर्यंत, आधार कार्डधारकाल त्यांच्या आधार कार्डमध्ये कोणत्याही प्रकारचे अपडेट करण्यासाठी 25 रुपये ऑनलाईन आणि 50 रुपये ऑफलाईन शुल्क भरावं लागत होतं. म्हणजेच, कागदपत्र अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर गेल्यास 50 रुपये आकारले जात होते. जर हे काम myAadhaar पोर्टल द्वारे केलं गेलं असेल तर 25 रुपये फी भरावी लागणार होती. परंतु, 15 मार्च 2023 पासून ऑनलाईन आधार अपडेटची सुविधा पूर्णपणे मोफत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!