Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SambhajiBhideNewsUpdate : परवानगी नसताना सभा , संभाजी भिडे यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा …

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरुद्ध पोलिसांनी परवानगी नाकारली असताना सभेचे आयोजन केल्या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलीस कर्माचारी रितेश नाळे यांनी या संदर्भात लाेणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे शनिवारी (२ सप्टेंबर) संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

Advertisements

भिडे यांनी वादग्रस्त विधाने करुन समाजात तेढ निर्माण करत असल्याने त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटना, राजकीय पक्षांकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. भिडे यांची सभा झाल्यास उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता.

Advertisements
Advertisements

याबाबत लोणीकंद पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. परवानगी नाकारल्यानंतर भिडे यांची सभा झाल्याने पोलिसांनी रविवारी मध्यरात्री संयोजकांसह भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!