Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

INDIANewsUpdate : इंडिया आघाडीच्या नेत्यांचा मोदी सरकारवर हल्ला बोल , विविध समित्यांची स्थापना …

Spread the love

मुंबई : देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया या नावाने आघाडीची स्थापना केली असून या आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. आज या बैठकीचा समारोप होत असताना पत्रकार परिषदही घेण्यात आली. यावेळी इंडिया आघाडीच्या विविध नेत्यांनी आपली भूमिका मांडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून राष्ट्रवादीतून बंड केलेल्या अजित पवार यांच्या गटावरही निशाणा साधला आहे.

‘आम्ही चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही आणि जे चुकीच्या रस्त्यावर गेले आहेत, त्यांनाही योग्य रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न करू. मात्र ते योग्य रस्त्यावर येण्यास तयार नसतील तर त्यांना बाजूला करू,’ असं म्हणत शरद पवार यांनी नामोल्लेख न करता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील बंडखोर गटाला इशारा दिला आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली जात असतानाच इंडियाच्या बैठकीत शरद पवार यांनी अशी आक्रमक भूमिका घेतल्याने आता अजित पवार गटाची डोकेदुखी वाढणार आहे.

लालूप्रसाद यादव

इंडियाच्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यांनीही आपल्या खास शैलीत भाजपचा समाचार घेतला. ‘आपल्या शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे भारत चंद्रावर पोहोचला आहे. मात्र इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना मी एक आवाहन करणार आहे की, त्यांनी पंतप्रधान मोदींना सूर्यावर नेऊन सोडावं, म्हणजे मोदींचं पूर्ण जगभरात नाव होईल,’ असा टोला लालूप्रसाद यादवांनी लगावला आहे.

मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला पराभूत करण्यासाठी काय रणनीती आखली जावी, याबाबत चर्चा झाली. तसंच जागावाटप, अजेंडा आणि निवडणूक प्रचार रॅलीबाबतचे काही महत्त्वपूर्ण ठरावही मंजूर करण्यात आले. या बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या विविध समित्यांची घोषणा करण्यात आली

इंडिया आघाडीकडून समन्वय समिती, निवडणूक प्रचार समिती, मीडिया समिती, सोशल मीडिया समिती तसेच संशोधन समितीची स्थापना करण्यात आली आहे. समन्वय समितीमध्ये विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही नावाचा समावेश आहे.

इंडियाच्या समन्वय समिती

१. के. सी वेणुगोपाल
२. शरद पवार
३. हेमंत सोरेन
४. संजय राऊत
५. तेजस्वी यादव
६. अभिषेक बॅनर्जी
७. राघव चढ्ढा
८. जावेद अली खान
९. लल्लन सिंह
१०. डी राजा
११. उमर अब्दुल्ला
१२. मेहबुबा मुफ्ती
१३. टी. आर. बालू

आपलं सरकार

Click to listen highlighted text!