UddhavThackerayNewsUpdate : उद्धव ठाकरे यांना प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावाची प्रतीक्षा

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज अनेक मुद्दावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे . यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीतील प्रवेशविषयी आपली प्रातिक्रिया दिली आहे.
या विषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि आमची नजीकच्या काळात भेट झाली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष बोलणी झालेली नाही. मी त्यांना सांगितलं की, तुमच्या मनात काय आहे, ते सांगा. तुमचा प्रस्ताव आम्हाला द्या. आम्हाला अंदाज येईल. आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील समीकरणे बदलेली आहेत. तुमचा प्रस्ताव आला की, महाविकास आघाडीशी बोलून निर्णय़ घेता येईल.
अजुनही प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्ताव द्यावा. मला आशा आहे की ते प्रस्ताव देतील. अजुनही जागावाटप झालेलं नाही. तो प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा होईल आणि निर्णय घेतला जाईल, असंही उद्धव यांनी म्हटलं.
आघाडीत जागावाटपाचा तिढा समोर येणार यावर उद्धव म्हणाले की, देशभर हा तिढा निर्माण होणार आहे. भाजपमध्ये देखील राम राहिला नाही. भाजपचा राम कधीच गेलेला आहे. आहेत ते फक्त आयाराम. भाजप आयारामांचा पक्ष आहे. आयारामांना सामावून घेताना तुमच्या पक्षातील मुळ रामाला तुम्ही कामापुरतं वापरणार का, असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला.
आजच मी वाचलं, महाराष्ट्र निर्यातात मागे आहे. मात्र आमदारांच्या आयातीत महाराष्ट्र पुढं आहे. आपण जागा वाटपाचा तिढा म्हणतो, तिकडे मंत्रीपदाचा तिढा आहे, अशी टीका करताना महाविकास आघाडीतील तिढा नक्की सोडवणार, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.