NCPCrisesNewsUpdate : अजित पवार गटाने शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवले, अजित पवार नवे राष्ट्रीय अध्यक्ष

मुंबई : राष्ट्रवादीचे बंडखोर गट आणि शरद पवार यांच्या स्वतंत्र बैठका झाल्यानंतर सायंकाळ होता होता दोन्हीही गटातील राजकीय युद्ध चांगलेच पेटले आहे. आता अजित पवार गटाने शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवून अजित पवारांना नवे राष्ट्रीय अध्यक्ष केले आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात नमूद तसे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच शरद पवार हेच त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत असे अजित पवार यांनी म्हटले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्रासह अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष बनवण्याची माहिती निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली होती. जो केंद्रीय निवडणूक आयोगाला 5 जुलै रोजी मिळाला.
शरद पवार गटानेही याचिका दिली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी निवडणूक आयोगाला जयंत पाटील (शरद पवार गट) यांचेही पत्र प्राप्त झाले. ज्यामध्ये अजित पवारांसोबत शपथ घेणाऱ्या 9 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अशा स्थितीत अजित पवार यांनी केलेल्या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावणी घेतली तर त्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय सुनावणी घेऊ नये.
तीन दिवसांपूर्वी अजित पवार काय म्हणाले होते?
तीन दिवसांपूर्वी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार राष्ट्रीय अध्यक्षांच्या प्रश्नावर म्हणाले, शरद पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे तुम्ही विसरलात का? महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले होते की, आम्ही त्यांना (शरद पवार) यांना (शरद पवार) हात जोडून विनंती करतो की त्यांनी पक्षातील बहुतांश ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेचा आदर करावा. त्यांचे आशीर्वाद आमच्यावर आणि पक्षावर सदैव राहोत.
मात्र आता अजित पवार गटणे म्हटले आहे की , 11 आणि 12 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय महाअधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि इतर काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहून शरद पवार यांच्या बाजूने मतदान केलेल्या व्यक्तींची कोणतीही नोंद नाही, त्यामुळे शरद पवार यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती बेकायदेशीर ठरेल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
अजित पवार यांची निवड
30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ आणि संघटनात्मक दोन्ही विभागातील बहुसंख्य सदस्यांनी एक ठराव पारित केला आहे. ज्याद्वारे अजित अनंतराव पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षांपैकी एक होते आणि अजूनही आहेत. राष्ट्रवादीने अजित पवार यांची महाराष्ट्र विधानसभेतील राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला राष्ट्रवादीच्या आमदारांनी प्रचंड बहुमताने मंजूरी दिली आहे.
अध्यक्षपदासह राष्ट्रवादी कॉंग्रेसची संपूर्ण रचना मोठ्या प्रमाणात सदोष आहे, कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घटनेतील तरतुदींनुसार कोणतीही नियुक्ती केलेली नाही. अध्यक्षपदासह कोणत्याही पदासाठी निवडणूक प्रक्रिया पाळण्यात आलेली नाही.
निवडणूक आयोग1968 च्या पक्ष चिन्ह निवाड्याचा आधार घेईल. सध्याची माहिती, परिस्थिती आणि पुराव्याद्वारे निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. निवडणूक आयोग याप्रकरणात योग्य निर्णय घेईपर्यंत पक्षाच्या सदस्यांना काढून टाकणे अथवा निलंबित करण्याची कारवाई कुणीही करु शकत नाही.
अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ आणि संघटनात्मक दोन्ही शाखांच्या प्रचंड बहुमताचा पाठिंबा आहे. निवडणूक आयोग या प्रकरणाचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही सदस्यावर पक्षातील कोणीही दिलेल्या आदेशाचा कोणताही परिणाम होणार नाही.