CrimeNewsUpdate : आदिवासी मुलावर लघुशंका करणारा मुजोर भाजप नेता अखेर गजाआड..

भोपाळ : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियात एक संतापजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये एक मुजोर तरुण एका आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात असून त्याला आता पोलिसांनी अटक केली
मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्याच्या कुब्री गावातील घटनेचा हा व्हिडिओ आहे. आरोपी तरुणाचे नाव प्रवेश शुक्ला असून तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी प्रवेश शुक्लाने याने एका आदिवासी मजुरावर दादागिरी करत त्याच्या अंगावर, चेहऱ्यावर आणि डोक्यावर लघुशंका केली. या किळसवाण्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आरोपी प्रवेश शुक्लावर अॅट्रआॅसिटी कायद्या बरोबरच एनएसए लावण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान आरोपींची चौकशी सुरू असून लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती सिद्धीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंजुलता पटले यांनी दिली . लिसांनी आरोपी प्रवेश शुक्ला याला काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरातून ताब्यात घेतले. दरम्यान आरोपी प्रवेश शुक्लाने इकडे तिकडे लपण्याचा खूप प्रयत्न केला, पण अखेर पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
मध्य प्रदेश पोलीस आरोपीला पकडण्यासाठी सायंकाळपासूनच शोध घेत होते. आम्ही आरोपी प्रवेश शुक्लाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई लवकरच केली जाईल अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अधीक्षक अंजुलता पटले यांनी दिली आहे.
देशभरातून या प्रकरणावरुन मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 294, 504 आणि अनुसूचित जाती जनजाती संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. हा सर्वांसाठी नैतिक धडा असावा, त्यामुळे आम्ही त्याला सोडणार नाही. आरोपीचा कोणताही धर्म नाही, जात नाही आणि पक्षही नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आरोपी हा आरोपीच असतो असेही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले.
दरम्यान, स्थानिक प्रशासनाने प्रवेश शुक्लाच्या घरावर बुलडोजर चढवला आहे. आरोपीच्या घराचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले असून घराचा काही भाग पाडला आहे.
व्हिडीओत काय आहे?
एका मुजोर तरुणाने एका गरीब मजुराच्या अंगावर लघुशंका केली आहे. आरोपीनं पीडित तरुणाच्या अंगावर, तोंडावर आणि डोक्यावर लघवी केली आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पीडित व्यक्ती आदिवासी समाजाताली असून करौंडी गावची आहे.