CourtNewsUpdate : बृजभूषण शरण सिंहच्या अडचणीत वाढ , तक्रार मागे घेत साक्ष फिरविणाऱ्या अल्पवयीन मुलीला नोटीस ..

नवी दिल्ली : दिल्ली न्यायालयाने राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून नंतर साक्ष फिरविणारी अल्पवयीन कुस्तीपटू व तिचे वडील यांना दिल्ली न्यायालयाने नोटीस पाठविली आहे . न्यायालयाने साक्ष फिरविल्याबद्दल १ ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे.
या न्यायालयात तक्रार रद्द करण्याच्या प्रकरणात सुनावणी झाली. आधी लैंगिक शोषणाचे आरोप करून नंतर साक्ष बदलणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूंची बाजू आम्हाला ऐकून घ्यायची असे दिल्ली न्यायालयाचे म्हणणे आहे. ही बाजू ऐकून घेतल्यानंतरच न्यायालयीन तक्रार रद्द करायची की नाही ते ठरवले जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे.
बृजभूषण सिंह यांच्यावर सहा महिला कुस्तीपटूंनी न्यायालयात एक दुसरी तक्रार दाखल केलेली आहे. त्या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी १५०० पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. यात बृजभूषण यांच्याविरुद्ध ७ साक्षीदार मिळाले आहेत. याशिवाय कथित लैंगिक शोषण झालेल्या ठिकाणीही बृजभूषण यांच्या उपस्थितीचे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत.