CoronaNewsUpdate : चीनमध्ये कोरोनाचा स्फोट , साडेतीन कोटींना एकाच दिवशी लागण , भारतात हाय अलर्ट …

बीजिंग: चीनमधील जवळपास ३७ दशलक्ष (३.७ कोटी) लोकांना या आठवड्यात एकाच दिवशी कोविड-१९ ची लागण झाली असावी, असे ब्लूमबर्ग न्यूजने शुक्रवारी सांगितले. अहवाल चीनी सरकारच्या उच्च आरोग्य प्राधिकरणाच्या अंदाजांचा हवाला देत होता. डिसेंबरच्या पहिल्या २० दिवसांत सुमारे २४.८ कोटी लोकांना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे. यामुळे देशाचा उद्रेक जगातील सर्वात मोठा होईल.
डिसेंबरच्या पहिल्या २० दिवसांत सुमारे २४८ दशलक्ष लोकांना, जे लोकसंख्येच्या जवळपास १८% आहे, त्यांना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे, असे अहवालात म्हटले आहे, बुधवारी झालेल्या चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अंतर्गत बैठकीच्या मिनिटांचा हवाला देऊन, रॉयटर्सने वृत्त दिले.
Union Health Minister Dr Mansukh Mandaviya holds a meeting with State health ministers on the COVID-19 situation and preparedness.
(Photo source: MoHFW) pic.twitter.com/cxPOAD9hp1
— ANI (@ANI) December 23, 2022
केंद्राचा हाय अलर्ट
दरम्यान चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चीनमध्ये काही शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकाराने राज्यांना सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्चस्तरीय बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी कोरोना प्रतिबंधासाठीच्या तयारीबाबत चर्चा केली. बैठकीत मनसुख मांडविया यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगामी सण आणि नवीन वर्षाचे उत्सव लक्षात घेऊन ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट आणि लसीकरण’ वर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. याशिवाय मास्क लावणे, हात स्वच्छ ठेवणे आणि सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. केंद्राने इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि तीव्र श्वसन आजाराच्या प्रकरणांचे नियमित जिल्हानिहाय निरीक्षण आणि अहवाल देण्यास सांगितले आहे.
RT-PCR चाचण्या वाढवण्याच्या सूचना
आरोग्या मंत्र्यांनी सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा आणि कोविड-१९ व्यवस्थापनासाठी पूर्णपणे तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र आणि राज्यांनी सहकार्याच्या भावनेने काम करणे आवश्यक आहे, मागच्या वेळी आलेल्या दोन लाटत जस काम केले तसंच यावेळीही काम करण्याचा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यांना कोविड नियमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात RT-PCR चाचण्या वाढवण्यास सांगण्यात आले आहे. नवे व्हेरियंट या काळात शोधली जाऊ शकतात, त्यामुळे जास्तीत जास्त केसेसचे चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लसीकरण वाढवण्यासाठी राज्यांना जनजागृती मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय बूस्टर डोसची व्याप्ती वाढवण्यासही सांगण्यात आले आहे.