Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तूर्त स्थगित, हे आहे कारण …

Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून तामिळनाडूतील कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत निघालेली भारत जोडी यात्रा दिवाळीनिमित्त तीन दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे. काँग्रेस कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले की, प्रवासी संघातील बहुतांश सदस्य दिवाळीनिमित्त आपापल्या घरी गेले आहेत. त्यामुळे दिवाळीपर्यंत यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


त्यांनी सांगितले की, राहुल गांधी देखील दिवाळीला दिल्लीला गेले आहेत आणि ते २६ ऑक्टोबर रोजी पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या काँग्रेसचे अध्यक्षपद स्विकारण्याच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ही यात्रा २६ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर रोजी सर्व पदयात्री पुन्हा भारत जोडो यात्रेत सामील होतील, असे काँग्रेस प्रवक्ते म्हणाले. राहुल  गांधी २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा भारत जोडो यात्रेत सामील होतील.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. नुकताच १००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे. या संपूर्ण प्रवासात राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत आणि त्यांच्यासोबतचे खास क्षण शेअर करत आहेत. कर्नाटकातील मंड्या येथील या यात्रेत सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!