PuneNewsUpdate : पुणे स्टेशनवर चेंगरून प्रवाशाचा मृत्यू , दिवाळीत प्रचंड गर्दी…

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून ऐन दिवाळीत गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाला चेंगराचेंगरीत आपला प्राण गमवावा लागला आहे. पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये घुसण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी गर्दी झाली होती त्यावेळी हि घटना घडली. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून नक्की ही घटना कशामुळे घडली याचा पोलिस तपास करत आहेत. बौधा मांजी ऊर्फ यादव (वय २१) असे मृत्यु पावलेल्या प्रवाशाच्या नावे आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या चेंगराचेंगरीत आणखी एक जण गाडीखाली सापडल्याचे सांगण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार पुणे – दानापूर या एक्स्प्रेसला नेहमीच गर्दी असते असे सांगण्यात येत आहे. विशेष करून बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांना नेहमीच प्रचंड गर्दी असते. त्यात दिवाळीत लोक घरी जाण्यासाठी गर्दी करीत आहेत.
दरम्यान रेल्वे प्रशासनाने दिवाळीत एसी डबे वाढवले परंतु सर्वसामान्य गरीब कामगार, कष्टकरी प्रवाशांसाठीच्या सध्या डब्यात कुठलीही वाढ केलेली नसल्याने या वर्गाचे प्रचंड हाल होतात. त्यातूनच आज चेंगराचेंगरी होऊन एका प्रवाशाला आपले प्राण गमवावे लागेल. याबाबत रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले की, पुणे -दानापूर ही रेल्वे गाडी पुणे स्थानकावरील प्लॅटफाॅर्म १ वर येत होती. त्यावेळी जनरल डब्यात चढत असताना एका प्रवासी खाली पडला. त्यात तो बेशुद्ध झाला असून त्याला रेल्वे पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दानापूर गाडीला सुरुवातीला व शेवटीची असे प्रत्येकी २ -२ अनारक्षित डबे असतात. या डब्यांमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. गाडी प्लॅटफॉर्मला लागत असताना शेवटच्या २ डब्यांमध्ये चढण्यासाठी प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यात मांजी हे खाली पडले. त्यांच्या अंगावरुन लोक डब्यात चढत होते. त्यात ते बेशुद्ध पडले. प्लॅटफॉर्म वरील लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रेल्वे पोलिसांना कळविले. त्यांना प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला. नंतर ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यु झाल्याचे घोषित करण्यात आले. मांजी आधीच आजारी होते असे सांगण्यात येत आहे.