AurangabadNewsUpdate : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि भाजपनेते रावसाहेब दानवे यांचा एकत्र प्रवास … !!

औरंगाबाद : राज्यात सर्वत्र शिवसेनेच्या चिन्हाबद्दल आणि पक्षाचे नाव वापरण्यावरून निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरून वातावरण तापलेले असताना राष्ट्रवादीचे नेते औरंगाबाद दौऱ्यावर आहेत . या दौऱ्यात त्यांनी बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमाला जाताना भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह एकाच गाडीतून प्रवास करणे पसंत केल्यामुळे अनेकांच्या बुवाय उंचावल्या आहेत.
आपल्या नागपूर दौऱ्यावरून पवार रात्री मुक्कामासाठी औरंगाबाद शहरात आले. रात्री त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दरम्यान औरंगाबादमध्ये शरद पवार पोहोचले असता शहरात रावसाहेब दानवे यांची भेट झाली. त्यानंतर शरद पवार आणि रावसाहेब दानवे यांनी एकाच गाडीने प्रवास केला. परस्परांच्या विरोधात बोलण्याची एकही संधी न सोडणारे पवार आणि दानवे हे राजकीय दुश्मन एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने चार तासांची बैठक घेऊन शिवसेनेचं पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठावलं आहे. यामध्ये आता शिवसेनेसमोर दुसरे नाव जोडावे लागणार आहे. या घटनेवर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शिवसेना अजिबात संपणार नाही, ती आणखी जोमाने वाढणार आहे. शिवसेनेमध्ये जी तरुणपिढी आहे, ती आणखी जोमाने काम करणारी आहे, असं शरद पवार म्हणाले.
‘निवडणुकामध्ये जर जायचे असेल तर आणि एखादी संघटना असेल. त्यावेळी चिन्ह असेल किंवा नसेल तरीही निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दाखवली पाहिजे’ असा सल्लाही शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिला. ‘मला अजिबात आश्चर्य वाटत नाही, हा निर्णय होईल याची मला खात्री होती. अगदी निर्णय कोण घेणार याची माहिती नव्हती. निर्णय गुजरातमधून घेतले जातील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे जे काही घडायचं ते घडलं आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.