UttarPradeshNewsUpdate : मागास हिंदू महिलांना नवरात्री उत्सवात देवीची मूर्ती बसविण्यास मनाई …

लखनौ : उत्तर प्रदेशातील एका गावात तथाकथित उच्चवर्णीय हिंदूंनी मागास हिंदू महिलांना नवरात्रीच्या काळात मूर्ती बसवण्यापासून रोखल्याची घटना समोर आली आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातील आहे, जिथे मागास हिंदूंना एका विशिष्ट जातीकडून नवरात्रीला मूर्ती बसवण्यास मनाई केली जात आहे. यानंतर या महिलांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्ज देण्यासाठी या गावातील महिला सरपंचही उपस्थित होत्या.
हे प्रकरण महोबा जिल्ह्यातील कुलपहाड कोतवाली भागातील रावतपुरा खुर्द गावातील आहे. येथील एका विशिष्ट जातीच्या लोकांनी गावातील मागास हिंदू महिलांना मूर्ती बसवण्यास मनाई केल्याचे सांगितले जात आहे.
याबाबतचा वाद गावात फारसा वाढू नये म्हणून गावच्या सरपंच उमादेवी यादव यांनी पुढाकार घेतला. यासोबतच पीडित महिलांच्या बाजूने अर्ज देण्यासाठी तिने एसडीएम आणि न्यायाधिकारी यांच्याकडे धाव घेतली. यावेळी तुम्ही मूर्ती स्थापनेची तयारी करा, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले आहे.