Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Shivsena News Update : मोठी बातमी : मुंबई महापालिकेने शिवतीर्थ मैदानाबाबत अखेर घेतला निर्णय…

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : दादरच्या शिवतीर्थावर कोणाचा दसरा मेळावा होणार ? याची मुख्यमंत्र्यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात परवानगीच्या अर्जाची लढाई सुरू झाली होती मुंबई महापालिकेने हे दोन्हीही अर्ज निकाली काढत दोन्हीही गटांना परवानगी नाकारली असल्याचे वृत्त आहे. हे अर्ज नाकारताना महापालिकेने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दिले आहे.

Advertisements

दरम्यान ही शक्यता लक्षात घेऊनच शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. विशेष म्हणजे काहीही झाले तरी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच घोषित केल्यामुळे आता न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देणार ? याकडे शिवसेनेचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements

शिंदे गटाला मात्र एमएमआरडीएच्या वतीने आधीच बीकेसीच्या मैदानावर परवानगी दिली असल्याने त्यांच्या मेळाव्याचा प्रश्न सुटला आहे. शिवसेनेसमोर मात्र जागेचे प्रश्न चिन्ह तूर्त तरी कायम आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!