IndiaNewsUpdate : वाढदिवशी मोदींची देशाला अनोखी भेट , नामिबियाहून आणले आठ “पॅन्थर “

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवशी देशाला अनोखी भेट देत नामिबियाहून आठ चित्त्यांना घेऊन एक विशेष विमान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर विमानतळावर उतरले आहे. आता या चित्त्यांना भारतीय वायुसेनेच्या चिनुक हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येत असून तेथे त्यांना सोडण्यात येणार आहे. पूर्वीच्या योजनेनुसार, या चित्त्यांना घेऊन जाणारे विमान राजस्थानमधील जयपूर येथे उतरायचे होते, तेथून ते केएनपीला पाठवले जाणार होते.
शनिवारी सकाळी ग्वाल्हेरच्या महाराजपुरा एअरबेसवर चित्ते दाखल झाले. यानंतर, त्यांना लवकरच भारतीय हवाई दलाच्या चिनूक (IAF चिनूक) हेलिकॉप्टरद्वारे कुनो राष्ट्रीय उद्यानात पाठवले जाईल. राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील श्योपूर येथे आहे, जे ग्वाल्हेरपासून सुमारे १६५ किमी अंतरावर आहे. पूर्वी भारतात मोठ्या प्रमाणात चित्ते सापडत होते, पण हळूहळू त्यांची संख्या खूपच कमी होत गेली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवशी या चित्त्यांना कुनो पार्कच्या क्वारंटाईन एन्क्लोजरमध्ये सोडणार आहेत, या बाबत अधिक माहिती देताना , मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) वन्यजीव जेएस चौहान यांनी शुक्रवारी ‘पीटीआय-भाषा’शी संवाद साधताना सांगितले की, “चित्ता ग्वाल्हेरला पोहोचतील आणि तेथून त्यांना विशेष हेलिकॉप्टरद्वारे केएनपीला पाठवले जाईल.”
अधिकार्यांनी सांगितले की, आठ चित्त्यांपैकी पाच माद्या आणि तीन नर, ज्यांना नामिबियाची राजधानी विंडहोक येथून विशेष मालवाहू विमान बोईंग ७४७-४०० ने ग्वाल्हेर विमानतळावर आणले जात आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ग्वाल्हेरमधील चित्त्यांना भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरद्वारे केएनपी हेलिपॅडवर उतरवण्यात येणार असल्याची पुष्टी केली.
चित्ता संवर्धन निधी (CCF) नुसार, KNP मध्ये आणले जाणारे पाचही चित्ते दोन ते पाच वर्षांच्या दरम्यान आहेत, तर नर चित्ता 4.5 ते 5.5 वर्षांच्या दरम्यान आहेत. १९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. ‘भारतातील आफ्रिकन चित्ता परिचय प्रकल्प’ २००९ मध्ये सुरू झाला आणि अलीकडच्या काळात त्याला गती मिळाली आहे.
भारताने चित्यांच्या आयातीसाठी नामिबिया सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.