Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये राडा , आ. सदा सरवणकर यांच्याविरुद्ध गोळीबार केल्याचा गुन्हा …

Spread the love

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यात सर्वत्र वाद चालू आहेत . मुंबईतही अशाच एका वादातून झालेल्या भांडणातून आमदार सदा सरवणकर यांनी  गोळीबार केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या  पिस्तुलातून निघालेली गोळी ही त्यांच्या शेजारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागली असती तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव गेला असता असा जबाब  संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने नोंदवला आहे.


दरम्यान  शिवसेना नेते अनिल परब यांनी कायद्याचा आधार घेत पोलिसांना सरवणकर यांच्या गोळीबाराची बाब पटवून दिल्यांनतर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गु्न्हा दाखल केला, असे वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केले. ते रविवारी दादर पोलीस ठाण्याबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अरविंद सावंत यांचे आरोप

प्रभादेवी आणि दादर परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते, तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक केली होती. यानंतर शिवसेनेचे मुंबईतील बडे नेते सक्रिय झाले होते. हे सर्वजण रविवारी सकाळपासून दादर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते. यावेळी अरविंद सावंत यांनी सदा सरवणकर यांच्यावर चांगलीच टीका  केली. सदा सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलातून राडा झाला त्याठिकाणी आणि पोलीस स्टेशनच्या परिसरात अशा दोन ठिकाणी फायरिंग केले. आमचे शिवसैनिक याची तक्रार दाखल करायला गेले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले, असा आरोप अरविंद सावंत यांनी केले.


दादरमधील वातावरण तापले

दरम्यान  दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसैनिक आणखीनच आक्रमक झाले. त्यांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच शिवसैनिकांच्या एका गटाने दादर परिसरातील समाधान सरवणकर यांचे बॅनर्स फाडायला सुरुवात केली . याशिवाय, समाधान सरवणकर यांच्या बॅनर्सवर काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे दादरमधलं वातावरण चांगलेच तापले आहे.

नेमका वाद काय झाला ?

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, शिंदे आणि शिवसेना या दोघांकडूनही स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या स्वागत कक्षावरुन एकमेकांना डिवचण्यात येत  होते. यावेळीशिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात घोषणा देत होते. दरम्यान गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी रात्री झालेल्या या वादाचे  रुपांतर हाणामारीत झाले होते. शनिवारी मध्यरात्री शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता.


दरम्यान, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस स्थानकात गोळीबार केला, असा आरोप शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केला आहे. तर सदा सरवणकर यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. घरगुती वादातून भांडण झाले , असे  सदा सरवणकर यांनी म्हटले आहे.

संतोष तेलवणे  फेसबुकवरील पोस्ट …

शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. ‘आवाज करणार…तर…ठोकणारच…आज पेग्विन सेनेला…स्वतःची लायकी समजलीच असेल..’ असं म्हणत संतोष तेलवणे यांनी फेसबकुवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!