IndiaNewsUpdate : उपराष्ट्रपतीपदाची ऑफर मलाही होती पण …सत्यपाल मलिक यांच्या या दाव्याची का होते आहे चर्चा …?

जयपूर : केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकारच्या विरोधात बोलणे बंद केल्यास उपराष्ट्रपती बनवले जाईल, असे संकेत आपल्याला देण्यात आले होते असा गौप्यस्फोट मेघालयाचे राज्यपाल सत्य पाल मलिक यांनी केला आहे. जगदीप धनखर यांची उपराष्ट्रपतीपदी नियुक्ती केल्यावर मलिक म्हणाले की, धनकडच या पदासाठीची योग्य उमेदवार आहेत. मला जसे सुचविण्यात आले तसे मी करू शकत नाही मला जे वाटते ते मी नक्कीच बोलतो. सत्यपाल यांच्या या दाव्यानंतर चान्गलीच चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान राहुल गांधी यांच्या “भारत जोडो ” यात्रेबद्दल बोलताना मलिक म्हणाले कि , “स्वतःच्या पक्षासाठी काम करणे ही चांगली गोष्ट आहे. ते तरुण आहेत, पायी चालत आहेत. आताचे नेते तर हे काम करत नाहीत. या यंत्रातून काय संदेश जाईल हे मला सांगता येणार नाही हे ते जनताच सांगेल , पण ते चांगले काम करत आहेत असे मला वाटते.
शेतकरी आंदोलन पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेवर ते म्हणाले, “शेतकरी आंदोलन… मी तर करणार नाही, परंतु शेतकऱ्यांना ते करावे लागेल, कारण परिस्थिती तशी दिसत आहे. केंद्र सरकारने एमएसपीची मागणी मान्य न केल्यास लढा तीव्र होईल पण सरकार या मागणीकडे लक्ष देईल असे वाटत नाही त्यामुळे आंदोलन होईल असे वाटत आहे.
दिल्लीतील राजपथचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ करण्याबाबत ते म्हणाले, “याची काही गरज नव्हती, हे नाव ब्रिटिशांनी नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले होते . “राजपथ” ऐकायलाही आणि बोलायलाही चांगला शब्द होता, सर्वना उच्चारताही येत होता, आता कर्तव्य पथ कोण उच्चारणार… ? पण चला आता बदलला आहे तर ठीक आहे.
दरम्यान आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या छाप्यांवर केंद्र सरकारच्या टीकेवर मलिक म्हणाले, “भाजपच्या लोकांवरही काही छापे टाकले गेले तर ही गोष्ट सांगता येणार नाही. छापे मारण्यास पात्र असलेले अनेक लोक भाजपमध्ये आहेत. तुमच्या प्रियजनांवरही काही छापे पडले तर हा प्रश्नच उद्भवत नाही.