CongressNewsUpdate : महागाईच्या विरोधात काँग्रेसचे हल्ला बोल आंदोलन…

https://www.youtube.com/watch?v=gRtyS0QhkCI
नवी दिल्ली : काँग्रेसची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी आज रामलीला मैदानावर काँग्रेसच्यावतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात रॅली काढून आपले आंदोलन सुरु केले आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीच्या मुद्द्यावर ही रॅली काढण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅलीच्या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी शनिवारी ट्विट केले होते की, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने रामलीला मैदानावर रॅलीच्या आवाहनामुळे, कार्यक्रमाच्या आजूबाजूच्या काही भागात रस्ता बंद राहील.”
#WATCH | Delhi: Congress workers marching against price rise detained by the Delhi police. The protestors were moving from Banga Bhawan to AICC headquarters at Akbar Road pic.twitter.com/SNvlgChDgT
— ANI (@ANI) September 4, 2022
या रॅलीत राहुल गांधी यांच्यासह सचिन पायलट, अशोक गेहलोत, कमलनाथ, आराधना मिश्रा, कुमारी सेलजा असे अनेक बडे नेते उपस्थित आहेत. लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या समर्थकांची पोलिसांशी झटापट झाली, त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रामलीला मैदान सोडले. अधीर रंजन बंगा भवन ते काँग्रेस मुख्यालयापर्यंत मोर्चा काढत होते.
देशभर आंदोलन…
काँग्रेस नेत्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला देशभरातील 22 शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेतल्या आणि 4 सप्टेंबर रोजी रामलीला मैदानावर “महागाईवर हल्ला बोल रॅली” साठी “दिल्ली चलो” ची हाक दिली. या रॅलीला पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेते संबोधित करणार आहेत.
राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते की, आज देशासमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी, महागाई आणि वाढता द्वेष आहे. तर काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ म्हणाले की, केंद्र सरकार “विरोधकांना शांत करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) चा गैरवापर करत आहे”, परंतु पक्ष वाढत्या महागाई आणि जीवनावश्यक अन्नपदार्थांबद्दल चिंतित आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लादण्याच्या विरोधात आवाज उठविण्याची गरज आहे.
दिल्लीच्या रामलीला मैदानात काँग्रेसची महागाईविरोधात हल्लाबोल रॅली सुरू आहे. त्यात सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते देशभरात पोहोचले आहेत. महागाईविरोधातील ‘हल्ला बोल’ रॅलीत मोदी सरकारच्या महागाई, भ्रष्टाचार आणि ‘जनताविरोधी’ धोरणांचा विरोध करण्यात येत आहे.