World news update : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना मातृशोक….

नवी दिल्ली : काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे २७ ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. त्या दीर्घ काळापासून आजारी होत्या. काँग्रेसचे मीडिया प्रमुख जयराम रमेश यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
सोनिया गांधी या २३ ऑगस्टला इटलीला गेल्या होत्या. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी देखील इटलीमध्येच आहेत. पाऊलो मायनो यांचं ९७ व्या वर्षी निधन झालं.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे २७ ऑगस्ट रोजी इटलीत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या दफनविधीचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला.