RajsthanNewsUpdate : सरकार आमचे असले तरी हि घटना हल्ल्यात घेण्यासारखी नाही , पायलट यांचे पोलिसांवर गंभीर आरोप …

नवी दिल्ली : राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी, मंगळवारी काँग्रेसशासित राज्यातील दलित शालेय विद्यार्थ्याची तथाकथित “उच्च जाती” म्हटल्या जाणार्या पात्रातील पाणी पिण्याच्या कारणावरून हत्या केली. या घटनेचा निषेध केला. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबावर पोलिस कर्मचार्यांकडून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई का होत आहे असा सवाल स्वतःच्याच पक्षाच्या सरकारला विचारला.
पायलट म्हणाले कि , “फक्त या राज्यात केवळ आम्ही सरकारमध्ये आहोत म्हणून या गोष्टी आम्ही गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही.” दरम्यान या घटनेमुळे अशोक गेहलोत सरकारसमोर नवे संकट उभे राहिले आहे. एका आमदाराने राजीनामा दिला असून गेहलोत यांच्यावर पक्षांतर्गतही टीका होत आहे.
पायलट म्हणाले की, “सरकारने शिक्षक आणि शाळेवर कारवाई केली आहे. काही रक्कम नुकसानभरपाई म्हणूनही दिली आहे, पण विशेष म्हणजे जेव्हा मुलाचा मृतदेह आणला तेव्हा त्याचे कुटुंबीय आणि इतर लोक तिथे उपस्थित होते. पण पोलिसांनी लाठीमार केला. चार्ज केला.” “मुलाचे वडील आणि आजोबा जखमी झाले आहेत. ते अजूनही घाबरलेले आहेत. मी त्यांना आश्वासन दिले आहे की आम्ही त्यांना पूर्ण संरक्षण देऊ, पण समाजात स्पष्टपणे भीतीचे वातावरण आहे”.
दरम्यान कुटुंबावर पोलिसांची कारवाई हे राजस्थान सरकारचे अपयश आहे का ? असे विचारले असता , पायलट म्हणाले, “परिस्थिती कशामुळे निर्माण झाली हे मला माहित नाही. मला वाटते की सरकारने यात सहभागी असलेल्या पोलिस अधिकार्यांवर कारवाई केली पाहिजे पण कारवाई करण्यास उशीर का होत आहे हे माहित नाही.”