IndiaNewsUpdate : संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यासह आरएसएसच्या प्रोफाईल फोटोत फडकला तिरंगा …..

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) शुक्रवारी आपल्या सोशल मीडिया खात्यांच्या प्रोफाइल चित्रांवर तिरंग्याऐवजी आपला पारंपरिक भगवा ध्वज लावला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्तानं देश ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या प्रोफाईल पिक्चरवर तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे.
पीएम मोदींच्या आवाहनावर आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर तिरंग्याचा फोटो टाकला आहे. खरे तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष राष्ट्रध्वजावरून संघाच्या वृत्तीवर टीका करत आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी संघाचा स्पष्ट संदर्भ देत या महिन्याच्या सुरुवातीला नागपुरातील मुख्यालयात ५२ वर्षांपासून राष्ट्रध्वज न फडकावणारी संघटना तिरंगा लावण्याच्या पंतप्रधानांच्या विनंतीकडे लक्ष देईल का, असा सवाल केला होता.
स्वाधीनता का अमृत महोत्सव मनाएँ.
हर घर तिरंगा फहराएँ.
राष्ट्रीय स्वाभिमान जगाएँ. pic.twitter.com/li2by2b0dK— RSS (@RSSorg) August 13, 2022
RSS प्रचार विभागाचे सह-प्रभारी नरेंद्र ठाकूर यांनी शुक्रवारी सांगितले की, संघ आपल्या सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. संघाने आपल्या संघटनेचा ध्वज काढून टाकला आणि राष्ट्रध्वज त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या प्रोफाइल पिक्चरवर लावला लावला आहे. ठाकूर म्हणाले की, ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत संघाचे कार्यकर्तेही सक्रियपणे सहभागी होत आहेत.
केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लोकांना १३ ते १५ऑगस्ट दरम्यान घरांमध्ये राष्ट्रध्वज फडकावा किंवा प्रदर्शित करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी आरएसएसचे प्रचार विभाग प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले होते की, अशा गोष्टींचे राजकारण करू नये. ‘हर घर तिरंगा’ आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांना आरएसएसने आधीच पाठिंबा दिला आहे, असे ते म्हणाले होते.