IndiaNewsUpdate : पश्चिम बंगालमध्ये पार्थ नंतर काँग्रेसचे तीन आमदार अटकेत , नोटांची मोजदाद चालू …

कोलकता : तृणमूल काँग्रेसचे नेते आणि निलंबित मंत्री पार्थ यांच्यानंतर आता ईडीच्या कारवाईनंतर पोलिसांनी काँग्रेसच्या तीन आमदारांना शनिवारी अटक केली आहे. या आमदारांकडेही मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली आहे. विशेष म्हणजे हे तीनही आमदार झारखंडचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हावडाच्या एसपी स्वाती भंगालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार इरफान अन्सारी, राजेश कश्यप आणि नमन बिक्सल अशी अटक केलेल्या झारखंडच्या काँग्रेस आमदारांची नावे आहेत. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली असून नोटांची मोजदाद चालू आहे. झारखंडचे हे आमदार पश्चिम बंगालमध्ये का आले होते? आणि इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड ते कुठे घेऊन जात होते? याचा तपास पोलीस करीत आहेत.
Howrah,West Bengal| We've nabbed 3 MLAs of Congress from Jharkhand namely Irfan Ansari, MLA from Jamtara, Rajesh Kachhap, MLA from Khijri & Naman Bixal, MLA from Kolebira with huge amounts of cash. We would only be able to count it once counting machines come: SP Swati Bhangalia pic.twitter.com/yo8VYyW9Yq
— ANI (@ANI) July 30, 2022
झारखंडमधील जामतारा येथील हे तीन तीन आमदार एका वाहनातून पूर्व मिदनापूरच्या दिशेने जात होते. शनिवारी सायंकाळी पाचला पोलीस ठाण्यांतर्गत राणीहाटी मोरजवळ त्यांची गाडी थांबवून गाडीची झडती सुरू झाली तेंव्हा झडतीत हि रक्कम पोलिसांना आढळून आली. त्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे राणीहाटी मोर येथे विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली.
तृणमूल काँग्रेसचा आरोप
या घटनेवरून तृणमूल काँग्रेसने केंद्रावर निशाणा साधला आहे. टीएमसीने म्हटले आहे की केंद्र सरकार तपास यंत्रणांच्या मदतीने विरोधी पक्षांना निवडकपणे लक्ष्य करत आहे. मात्र, काँग्रेस आमदारांवर कारवाईची मागणी केल्याने विरोधकांच्या एकजुटीला नक्कीच तडा गेल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच टीएमसीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा न देण्याचे सांगितले आहे.
Amidst murmurs of horse-trading and the possible toppling of the Jharkhand Govt. 3 @INCJharkhand were found carrying huge sums of cash to Bengal.
What is the source of this money? Will any Central Agency take suo moto cognizance?
Or do the rules apply to a select few? https://t.co/hZzvqienx6— All India Trinamool Congress (@AITCofficial) July 30, 2022
दुसरीकडे झारखंड काँग्रेसचे कार्याध्यक्ष बंधू तिर्की म्हणाले की, हे भाजपचे षड्यंत्र दिसते. भाजप सत्तेत आल्यापासून हेमंत सोरेन सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र आणि इतर काही राज्ये पाहिली तर भाजप पैशाचा वापर करते हे स्पष्ट होईल. भाजपाला फक्त सत्तेत यायचे आहे. या तिन्ही आमदारांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून पक्षातील इतर सदस्यांना एक कडक संदेश जाईल अशी विनंती मी पक्षाच्या हायकमांडला करू इच्छितो.
विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सध्या ईडीच्या कारवाईत अटकेत असलेले पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीत सापडलेली रक्कम सर्वत्र चर्चेचा विषय आहे. चॅटर्जी यांच्या जवळची व्यक्ती असलेल्या अर्पिता मुखर्जीच्या दोन घरांमध्ये टाकलेल्या धाडीत आतापर्यंत ५० कोटी रुपयांची रोकड ईडीने जप्त केली आहे. तर सोनं आणि इतर मौल्यवान वस्तूही जप्त केल्या आहेत.