Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

maharashtraNewsUpdate : मंत्रालयात धार्मिक विधी , मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामधील कार्यालयात धार्मिकविधी केल्याप्रकरणी ठाण्यातील रहिवासी धनाजी सुरोसे यांनी त्यांच्याविरोधात ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Advertisements

या तक्रारीत म्हटले आहे कि , एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर  ७ जुलैला मंत्रालयामधील कार्यालयात सत्यनारायण कथा, पूजन केले. हे कृत्य राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यामध्ये शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा करता येत नाही. शासकीय नियम आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचेही यामध्ये उल्लंघन आहे. असे सुरोसे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी ठाणे न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार सोमवारी तक्रारीवर सुनावणी होणार आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!