EknathShindeNewsUpdate : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या …

मुंबई : आधी राज्याच्या विधान मंडळातील गट नेता , प्रतोद बदलणे आणि नंतर शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बदलून संसदेतील गट नेता आणि प्रतोदची नियुक्ती करणे आणि आता थेट शिवसेना पदाधिकाऱ्यांची निवड करणे असा कृती आराखडा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतला आहे .
याचाच एक भाग म्हणून शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करून नव्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी नियुक्तीपत्रेही स्वतःच्या हस्ते प्रदान केली आहेत. या निर्णयानुसार शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे. तर आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दिपक केसरकर हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहे.
दरम्यान शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
चर्चेतले एकनाथ शिंदे
आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून शुभेच्छा दिल्या खऱ्या पण यामध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिंदे यांनी पक्ष प्रमुख असा करण्याऐवजी माजी मुख्यमंत्री असा केला होता त्यामुळे त्यांच्या या ट्विटची आज माध्यमात दिवसभर चर्चा होती.
याशिवाय त्यांनी आज दिवसभरात ज्या कार्यक्रमांना हजेरी लावली त्याबद्दलचे इतर ट्विटही केले आहेत. यामध्ये अंबरनाथ उप शहरप्रमुख ह.भ.प. पुरुषोत्तम उगले यांच्या पुढाकाराने अंबरनाथ तसेच बदलापूर परिसरातील वारकरी संप्रदायातील अनेक नागरिकांनी नुकतीच माझी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केल्याचे म्हटले आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण प्रमाण मानून सुरू केलेल्या या वाटचालीबद्दल समर्थन देत आशीर्वाद दिले. 'जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुले' ही शिकवण प्रमाण मानून पुढील वाटचाल करू अशी ग्वाही यासमयी दिली. pic.twitter.com/IDHqUXE26W
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
याशिवाय शिवसेना नेते रामदास कदम यांनाही त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेना नेते रामदास भाई कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….@iramdaskadam
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
यावेळी श्री.रामदास भाई कदम ही मुलुखमैदानी तोफ पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी मैदानात धडाडावी अशी अपेक्षा व्यक्त करत आपल्या राजकीय आयुष्याची ही नवी इनिंग त्यांनी पुन्हा एकदा जोशात सुरू करावी अशा शुभेच्छा याप्रसंगी रामदास भाईंना दिल्या.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022