Droupadi Murmu Swearing Update : २१ तोफांच्या सलामीत द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ…

नवी दिल्ली : २१ तोफांची सलामीत देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली. संसदेत सकाळी १०.१५ वाजता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू देशाला उद्देशून पहिले भाषण दिले. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या नागरिक ठरल्या आहेत.
President Droupadi Murmu assumes the office of the President at the Rashtrapati Bhavan. Former President Ram Nath Kovind also present with her.
(Source: Rashtrapati Bhavan) pic.twitter.com/36Cnyyvqs5
— ANI (@ANI) July 25, 2022
राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला झालेली निवडणूक एकतर्फी ठरली. त्यात मुर्मू यांना ६४ टक्के, तर प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांना ३६ टक्के मते मिळाली होती. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. तसेच देशातील सर्वोच्च पदावर विराजमान झालेल्या त्या सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत.
"This is achievement of every poor in India": Draupadi Murmu becomes India's 15th President, first tribal leader to hold office
Read @ANI Story | https://t.co/j4VxBE0pTT#DraupadiMurmu #PresidentofIndia #15thPresidentofIndia pic.twitter.com/DgUW0xNF4f
— ANI Digital (@ani_digital) July 25, 2022
या शपथविधी सोहळ्याला या सोहळय़ाला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि प्रमुख नागरी आणि लष्करी अधिकारी, सरकारी विभागांतील अधिकारी उपस्थित होते.
देशवासियांना विनम्र अभिवादन…
पदाची शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतातील सर्व नागरिकांच्या आशा आणि आकांक्षा आणि अधिकारांचे प्रतीक असलेल्या या पवित्र संसद भवनातून मी सर्व देशवासियांना विनम्र अभिवादन करते. तुमची आत्मीयता, तुमचा विश्वास आणि तुमचा पाठिंबा माझ्यासाठी ही नवीन जबाबदारी पार पाडण्यासाठी माझी सर्वात मोठी ताकद असेल.
राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर निवड झाल्याबद्दल मी सर्व खासदार आणि विधानसभेतील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. तुमचे मत म्हणजे देशातील करोडो नागरिकांच्या विश्वासाची अभिव्यक्ती आहे. आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत असताना देशाने मला राष्ट्रपती म्हणून निवडून दिले आहे आणि आजपासून अवघ्या काही दिवसांतच देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. हा देखील योगायोग आहे की जेव्हा देश स्वातंत्र्याचे ५० वे वर्ष साजरे करत होता, तेव्हापासूनच माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि आज स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात मला ही नवी जबाबदारी मिळाली आहे.
कारगिल विजय दिवसाच्या आगाऊ शुभेच्छा…
त्या म्हणाल्या कि , “आमच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी या अमृतकालात आपल्याला जलद गतीने काम करावे लागेल. या ७५ व्या वर्षांत अमृतकालच्या सिद्धीचा मार्ग दोन मार्गांवर पुढे जाईल – सर्वांचा काळ , प्रयत्न आणि कर्तव्य सर्वांचे.” मुर्मू म्हणाल्या , उद्या म्हणजेच २६ जुलैला कारगिल विजय दिवसही आहे. हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचे प्रतीक आहे. आज मी देशाच्या सैन्याला आणि देशातील सर्व नागरिकांना कारगिल विजय दिवसाच्या आगाऊ शुभेच्छा देतो.”
राष्ट्रपती पुढे म्हणाल्या कि , “मी माझा जीवन प्रवास ओडिशातील एका छोट्या आदिवासी गावातून सुरू केला. मी ज्या पार्श्वभूमीतून आलो आहे, तिथे प्राथमिक शिक्षण घेणे माझ्यासाठी स्वप्नासारखे होते, परंतु अनेक अडथळे येऊनही माझा संकल्प दृढ राहिला त्यामुळेच माझ्या गावातील कॉलेजला जाणारी पहिली मुलगी बनले.”
नगरसेवक ते राष्ट्रपती पदाचा प्रवास…
“मी आदिवासी समाजातील असून, मला नगरसेवक पदापासून आज भारताचा राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली आहे. हेच लोकशाहीच्या जननी असलेल्या भारताचे मोठेपण आहे. दुर्गम आदिवासी भागात जन्मलेली मुलगी, भारताच्या सर्वोच्च संवैधानिक पदापर्यंत पोहोचू शकतो. राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे हे माझे वैयक्तिक यश नाही, ते भारतातील प्रत्येक गरीबाचे यश आहे. माझी निवडणूक याचा पुरावा आहे की भारतातील गरीब लोक स्वप्न देखील पाहू शकतात आणि ते पूर्ण करू शकतात.”
त्या शेवटी म्हणाल्या कि , शतकांपासून वंचित राहिलेल्या, विकासाच्या लाभापासून दूर राहिलेल्या, गरीब, दलित, मागासलेल्या, आदिवासींना माझ्यात आपले प्रतिबिंब दिसत आहे, ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. यामध्ये गरिबांच्या आशीर्वादांचा समावेश आहे. देशातील कोट्यवधी महिला आणि मुलींच्या स्वप्नांची आणि क्षमतांची हि झलक आहे. माझ्या या निवडणुकीत, जुन्या वाटा सोडून नव्या वाटेवर चालण्याचे धाडस आजच्या भारतातील तरुणांनी दाखवले. अशा प्रगतीशील भारताचे नेतृत्व करताना आज मला अभिमान वाटतो.