IndiaNewsUpdate : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले देशाला संबोधित…देशवासीयांची मानले आभार !!

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाच्या आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी देशाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आजच्याच दिवशी पाच वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला आणि तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मला भारताच्या राष्ट्रपतीपदी निवडून दिले. मी तुम्हा सर्व देशवासीयांचे आणि लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार व्यक्त करतो.
https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1551201906265329668
राष्ट्रपती आपल्या संबोधनात पुढे म्हणाले की, कानपूर जिल्ह्यातील पारौंख नावाच्या खेडे गावातील अत्यंत साध्या कुटुंबात वाढलेले राम नाथ कोविंद आज तुम्हा सर्व देशवासियांना संबोधित करत आहेत, यासाठी मी आपल्या देशातील चैतन्यशील लोकशाही व्यवस्थेच्या शक्तीला सलाम करतो. राष्ट्रपती कोविंद यांनीही देशाच्या विकासाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आपला देश २१ व्या शतकाला भारताचे शतक बनवू शकतो, हा माझा ठाम विश्वास आहे.
राष्ट्रपति के कार्यकाल के दौरान अपने पैतृक गांव का दौरा करना और अपने कानपुर के विद्यालय में वयोवृद्ध शिक्षकों के पैर छूकर उनका आशीर्वाद लेना मेरे जीवन के सबसे यादगार पलों में हमेशा शामिल रहेंगे।
— President of India (@rashtrapatibhvn) July 24, 2022
रामनाथ कोविंद यांनी आपल्या कार्यकाळात कानपूर येथील आपल्या गावाला भेट दिल्याचा उल्लेखही आपल्या भाषणात केला आहे. ते म्हणाले की, राष्ट्रपतींच्या कार्यकाळात माझ्या मूळ गावाला भेट देणे आणि माझ्या कानपूर शाळेतील जुन्या शिक्षकांच्या चरणांना स्पर्श करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असेल. राष्ट्रपती पुढे म्हणाले की, मी सर्व देशवासियांचे मनापासून आभार व्यक्त करतो. भारत मातेला वंदन करताना, मी तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
हवामान बदल ही देखील मोठी समस्या आहे. आज आपल्या पृथ्वीच्या भविष्याला गंभीर धोका आहे. आपल्या मुलांसाठी आपले पर्यावरण, आपली जमीन, हवा आणि पाणी यांचे रक्षण करावे लागेल. यावेळी राष्ट्रपतींनी तरुणांना विशेष आवाहनही केले. आपल्या मुळाशी जोडलेले राहणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले.
अपनी जड़ों से जुड़े रहना भारतीय संस्कृति की विशेषता है। मैं युवा पीढ़ी से यह अनुरोध करूंगा कि अपने गाँव या नगर तथा अपने विद्यालयों तथा शिक्षकों से जुड़े रहने की इस परंपरा को आगे बढ़ाते रहें। pic.twitter.com/mX3ErR8tSW
— President of India (@rashtrapatibhvn) July 24, 2022
ते पुढे म्हणाले कि , मी तरुण पिढीला विनंती करेन की , त्यांनी त्यांच्या गाव किंवा शहराशी आणि त्यांच्या शाळा आणि शिक्षकांशी जोडलेली राहण्याची ही परंपरा चालू ठेवावी. कोविंद म्हणाले की, त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आणि ते डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. एस. राधाकृष्णन आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे महान व्यक्तिमत्त्वांचे उत्तराधिकारी म्हणून अत्यंत जागरूक राहिले आहेत.