IndiaNewsUpdate : …तर महिलेला पुरुषाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : स्वतःच्या मर्जीने पुरुषासोबत राहणारी महिला संबंध बिघडल्यावर पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर एखाद्या महिलेचे कोणत्या पुरुषासोबत संबंध असतील आणि ती स्वत:च्या इच्छेने त्याच्यासोबत राहत असेल, त्यानंतर त्यांचे संबंध बिघडल्यावर महिला बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही, असे निरीक्षण नोंदवताना न्यायाधीश हेमंत गुप्ता आणि विक्रम नाथ यांच्या खंडपिठाने नोंदवून त्यांच्यासमोर आलेला आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपीवर बलात्कार, अनैसर्गिक गुन्हे आणि धमकीचा आरोप आहे.
यावर भाष्य करताना , न्यायालयाने म्हटले आहे की, ‘तक्रारदार महिलेचे अपीलकर्ता पुरुषासोबत संबंध होते आणि ते दोघे एकत्र राहत होते. आता त्यांचे संबंध बिघडले आहेत. पण या प्रकरणात भांदवि कलम 376 (2) (एन) अंतर्ग गुन्हा दाखल करता येणार नाही.’ राजस्थान उच्च न्यायालयाने भादंवि कलम 438 नुसार अटकपूर्व जामीनासाठी आरोपीचा अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी देत राजस्थान हायकोर्टाचा आदेश रद्द केला. ज्यामध्ये आरोपीचा जामीन फेटाळण्यात आला होता. खंडपीठाने म्हटले आहे की, अपीलकर्त्याला सक्षम अधिकार देण्यासाठी जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थान हायकोर्टाने आरोपीला 19 मे रोजीच्या अटकेच्या आदेशावर जामीन देण्यास नकार दिला होता. यावेळी हायकोर्टाने म्हटले की, याचिकाकर्त्याने तक्रारदार महिलेसोबत लग्न करण्याचा विश्वास देऊन संबंध ठेवले. या संबंधांमुळे एका मुलीचा जन्म झाला. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य पाहता याचिकाकर्त्याचा जामीन फेटाळण्यात आला.