ShivsenaNewsUpdate : कोण गेले याचा विचार न करता लढाईसाठी तयार राहा : उद्धव ठाकरे

मुंबई :पक्षातून कोण गेले याचा विचार न करता , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लढाईसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांची जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिला असून लोकांची कामे करून शिवसेना मजबूत असल्याचे लोकांना दाखवून द्या असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यापासून उद्धव ठाकरे सक्रीय झाले आहेत. मातोश्री तसेच शिवसेना भवनात त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख, पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. त्यानुसार आजही संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. महापालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंसमोर पक्षबांधणीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कोण गेले याचा विचार न करता निवडणुकीत शिवसेना मजबूत असल्याचे दाखवून द्या असे आवाहन केले. तसेच लढाईसाठी तयार राहा सांगताना आघाडीसंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर घ्या असे त्यांनी सांगितले. तळागाळात जाऊन मुंबईप्रमाणेच राज्यभरात लोकांची कामे करा असा आदेशही त्यांनी यावेळी दिला.