AurangabadNewsUpdate : औरंगाबादच्या नामांतराला विरोध , आज मूक मोर्चाचे आयोजन

औरंगाबाद : आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्यानंतर नामांतराला विरोध करण्यासाठी आज दुपारी २ वाजता औरंगाबादमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. एमआयएमसह शहरातील विविध २२ संघटनेचा हा मोर्चा असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे.
आज दुपारी २ वाजता हा मोर्चा भडकल गेटवरून निघून आमखास मैदानावर विसर्जित करण्यात येईल. यावेळी मोर्चेकरी आपल्या तोंडावर काळी पट्टी बांधतील. सोबतच हातात तिरंगा घेऊन मोर्चेकरी या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. यावेळी अंदाजे ५० हजार लोकं या मोर्च्यात सहभागी होतील असा दावा नामांतर विरोधी कृती समितीने केला आहे. ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी होतील असा दावा करण्यात आला आहे.
#WATCH | Maharashtra: Changing the name of Aurangabad will put a burden of around Rs 1000 crores on the govt. This is only to change the documents of the government department. Common people have to go through a burden of several thousand crores: AIMIM MP Imtiaz Jaleel (11.07) pic.twitter.com/hr17HeSxBF
— ANI (@ANI) July 12, 2022
सरकारी तिजोरीवर एक हजार कोटींचा बोजा : खा. जलील
दरम्यान औरंगाबादचे नाव बदलले तर सरकारी तिजोरीवर १००० कोटींचा बोजा पडेल असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. दरम्यान या नामांतरावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील हा निर्णय मविआच्या किमान समान कार्यक्रमात नव्हता त्यामुळे हि गोष्ट अनाकलनीय असून पवारांचे हे विधान हस्यास्पद असल्याचे सांगून खा. जलील म्हणाले कि, औरंगाबादवर नामांतराचा मुद्दा लादला जातोय. दोन-तीन टक्के असे लोक आहेत जे याकडे जाती-धर्माच्या बाजूने पाहतात. तर अनेक असेही लोक आहेत जे याला हिंदू-मुसलमानांचा मुद्दा बनवत आहेत. खरे तर हा असा मुद्दा होता कामा नये. एका शहराशी त्याची ओळख म्हणजेच इतिहास जोडलेला असतो.
जर तुम्ही शहराच नाव बदलले तर त्यावर मोठ्या प्रमाणावर सरकारी पैसा खर्च होतो. याचे विविध पैलू आहेत, मी याचा अभ्यास केला आहे. जर छोटे शहर असेल तर त्यासाठी किमान ५०० कोटी रुपयांचा खर्च येतो. दिल्लीतील एका बड्या अधिकाऱ्याने मला सांगितलं होतं की, जर मध्यम स्वरुपाचं शहर असेल आणि त्यात जर औरंगाबद शहर येत असेल तर तर १००० कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडतो, यापेक्षा जास्तही खर्च होऊ शकतो. हा खर्च केवळ सरकारी कागदपत्रांवरील नावं बदलण्यासाठी खर्च होतो. हा तुमचा आमचा पैसा आहे.
जलील पुढे म्हणाले कि , इतकंच नव्हे अनेक हजार कोटी रुपयांचा यामुळं सर्वसामान्य माणसावरही बोजा येतो. कारण जर शहराचं नाव बदललं तर आधार कार्डमध्ये बदल करुन घ्यावा लागतो. माझ्याकडे पासपोर्ट, ओळखपत्र असेल दुकान असेल तर त्याचं नाव बदलावं लागेल. यासाठी लोकांना रांगेत उभं राहून काम करावे लागतील. शिक्षणाविषयीची कागदपत्रे असतील तर त्यामध्ये देखील तुम्हाला आवश्यक तो बदल करावा लागेल. परदेशात शिक्षणासाठी जाताना तुमची शैक्षणिक कागदपत्रे जुळली नाहीत तर तुम्हाला तिथं प्रवेश मिळणार नाही. यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे रांगेत उभे राहणार नाहीत. इथे औरंगाबादकरांना त्रास सहन करावा लागेल.
-
महानायक ऑनलाईनची वर्गणी भरून “महानायक”ला सपोर्ट करा.
वार्षिक Rs. 999/
मासिक Rs. 99/-
किंवा आपल्या इच्छेनुसार …
PhonePay / GooglePay साठी …
9421671520
डेबिटकार्ड , क्रेडिटकार्ड आणि ऑनलाईन बँकींगसाठी…
https://www.instamojo.com/@mahanayakonline/