शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात आठवलेंची एंट्री

शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकल्या नंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षालाही वाटा देण्याची मागणी केली. याबाबत रामदास आठवले यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.
रामदास आठवले (Ramdas Athavle) ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज दिले pic.twitter.com/pZfBgokQWq
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) July 8, 2022