#शिंजोआबे हत्येचा संबंध सुरेंद्र राजपूत यांनी अग्निपथ योजनेशी जोडला

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो यांच्यावर गोळीबार करण्यात आल्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. दरम्यान, काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत (Surendra Rajput) यांनी शिंजो आबे (Shinzo Abe) हत्त्या प्रकरणी ट्वीट करत भाजपावर निशाणा साधला, तसेच या हत्येचा संबंध केंद्राच्या अग्निपथ योजनेशी जोडला आहे.
WorldNewsUpdate : प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी शिंजो आंबे यांचे निधन
शिंजो आबे यांना गोळी मारणारा यामागामी याने जपानच्या SDF म्हणजेच बिना पेनशन वाल्या सैन्यात सेवा बजावली होती. अशा आशयाचे ट्वीट केले आहे.
शिंजो आबे #ShinzoAbeShot
को गोली मारने वाला #tetsuyayamagami यामागामी
जापान की SDF यानी बिना पेंशन वाली सेना में काम कर चुका था।— Surendra Rajput (@ssrajputINC) July 8, 2022
दरम्यान, भाजपा नेते शेहजाद पूनावाला (Shehzad Poonawala) यांनी “शिंजो आबे यांच्या दुःखद निधनावर राजकारण केल्याबद्दल” राजपूत यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्याने शिंजो आबे यांच्या निधनावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी सुरेंद्र राजपूत यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न भाजपा नेते शेहजाद पूनावाला यांनी विचारला आहे. तसेच काहीतरी मर्य़ादा ठेवा असा सल्लाही पूनावाला यांनी राजपूत यांना दिला आहे.
The official spokesperson of Congress has chosen even the tragic passing away of Shinzo Abe to do petty politics
Here is his tweet link before he deletes it https://t.co/WKgocwEDFI
I wonder if Sonia & Rahul Gandhi will sack this atrocious person ! Have some limits please 🙏 pic.twitter.com/3LMzss4s2H
— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) July 8, 2022
वृत्तानुसार, ४२ वर्षीय तेत्सुया यामागामीने २००० साली तीन वर्षे सागरी सेल्फ-डिफेन्स फोर्समध्ये सेवा दिली होती. हल्ल्याच्या ठिकाणी त्याला अटक करण्यात आली असून परिसरातून एक बंदूक जप्त करण्यात आली आहे. आपण शिंजो आबे यांच्यावर असामाधानी होतो, त्यामुळे त्यांची हत्या करण्याची इच्छा होती असा खुलासा तेत्सुया यामागामी याने केला आहे. यामागामी याच्या घरी स्फोटकेही सापडल्याचे वृत्त आहे. शिंजो आबे यांच्यांवर गोळीबार केल्यानंतर तेत्सुयाने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. गोळीबारानंतर तो तिथेच थांबला होता. WorldNewsUpdate : प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी शिंजो आंबे यांचे निधन