Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : सत्तांतरानंतरचे कवित्व, फडणवीस म्हणतात आपण गनिमी काव्याने सरकार बनविले…

Spread the love

नागपूर : राज्यातील सत्तांतराचा नाट्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारस्थानाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या “गनिमीकाव्या”शी  केली आहे. आपण छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत  असे सांगून फडणवीस म्हणाले कि , शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत. छत्रपतींनी जो गनिमी कावा आपल्याला सांगितला, त्याच गनिमी काव्याने  आणि छत्रपतींसारखे निधड्या छातीने महाराष्ट्रात हे सरकार पुन्हा एकदा आले”, असे फडणवीसांनी यावेळी नमूद केले.

शिवसेना आमदारांच्या गृहयुद्धामुळे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आयते कोलीत आल्यानंतर त्यांनी बंडखोरांच्या मदतीने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीत खोडता घातला खरा पण त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेला यावर घालून केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बसविण्याचा बेरकी निर्णय घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांची इच्छा नसताना उपमुख्यमंत्री केले. याला देवेंद्र फडणवीस आपला शिवाजी महाराजांसारखा गनिमी कावा केला असे म्हणत आहेत हे उल्लेखनीय….

खरे तर हे सर्व का झाले ? कसे झाले ? याची उत्तरे बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतः जगजाहीर केले आहे. आणि केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यामुळे मुक्तपणे शपथ घेण्यास तयार झालेल्या फडणवीसांचे समर्थक याला लोकार्थाने फडणवीसांचा त्याग वगैरे म्हणून सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. खरे तर अशा स्थितीत फडणवीसांनी पक्षाचा आदेश मानला नसता तर काय केले असते ? संघाच्या शिस्तीत  वाढलेला माणूस ” एकनाथ शिंदे ” बनू शकत नाही हेच खरे आहे. कारण भाजपमध्ये पक्षाला आणि शीर्ष नेतृत्वाला आणि मातृ संघटनेला महत्व असते पक्ष , संघटनेतील कार्यकर्त्याला किंवा स्वयंसेवकाला नाही.

नागपुरात फडणवीसांचे भव्य स्वागत

राज्यात सत्ता बदल केल्यानंतर  देवेंद्र फडणवीस आज नागपुरात दाखल झाले. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनानंतर  विमानतळावरून त्यांची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीदरम्यान बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने  पाठीत खंजीर खुपसल्याची आठवण करून दिली. तसेच, शिवरायांच्या गनिमी काव्याने  सरकार परत मिळवल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान राज्यात आपण नव्याने आपले सरकार आणले आहे. एकनाथ शिंदे आपले मुख्यमंत्री आहेत. नागपूरचे  एकनाथ शिंदेंचे  स्वागत ठाणे-मुंबईलाही ऐकू गेलं पाहिजे”, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी अडीच वर्षात सरकार काहीही कामे करू शकले नाही , अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

दरम्यान शिंदे सरकार लवकरच पडेल आणि मध्यावधी निवडणूक लागतील असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले होते यावर बोलताना ते म्हणाले कि ,  काही लोक म्हणतात, हे सरकार ६ महिने चालेल. २०१४ चे सरकार आल्यानंतर तेव्हाही हेच म्हणायचे की वर्षभराच्या वर सरकार चालणार नाही. पण ४० वर्षांनंतर पहिल्यांदा ५ वर्ष पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता. २०२४मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे  सरकार आणल्याशिवाय राहणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!