AurangabadCrimeUpdate : पोलीस निरीक्षकांनी थोडा वेळ दिला आणि खुनाला वाचा फुटली….!!

औरंगाबाद : बेगमपुरा पोलिसांनी बेशुध्द इसमाच्या अंगावरील जखमांवरुन गोंदी येथील खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. २० जून रोजी , टाका शिवार गोंदी ता. अंबड येथे बाभळीचे घराजवळील झाड तोडल्यामुळे नामदेव घुगे (३५) याचे चुलत्याशी वाद होऊन हाणामारी झाली होती . त्या मधे नामदेव चा मृत्यू झाला . या प्रकरणात मयत नामदेव चे काका संभाजी, सोमनाथ, ज्ञानेश्वर, शिवाजी यांनी नामदेव ला लाकडाने मारहाण केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जून रोजी जखमी नामदेवला आरोपींनी घाटी रुग्णालयात दाखल केले. दाखल करतेवेळी रुग्णालयात दारुच्या नशेत पडल्याने जखमी झाल्याची नोंदही केली. २३ जून रोजी नामदेवचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी घाटी रुग्णालय परिसर व रुग्णालयात गस्त घातली असता, नामदेव घुगे चा मृतदेह रुग्णालयात दिसला. त्यांनी नातेवाईकांकडे विचारपूस केली असता तो दारुच्या नशेत पडल्याने जखमी होऊन मरण पावल्याचे सांगितले. पण मृतदेहाकडे पाहिल्यावर पोलिस निरीक्षक पोतदार यांना संशय आल्यामुळे त्यांनी मृतदेह डाॅक्टरांच्या समक्ष तपासला त्याच्या अंगावर मारहाणीच्या खूणा दिसत होत्या.
दरम्यान पोतदार यांनी गोंदी पोलिसांना याची माहिती देत नातेवाईकांना संशयावरुन ताब्यात घेतले.गोंदीचे पोलिस निरीक्षक बल्लाळ यांनी पोतदार यांच्याशी चर्चा झाल्यावर बल्लाळ यांनी पोलिस पथक पाठवून आरोपींना ताब्यात घेतले. मयत नामदेव यांची पत्नी गया घुगे यांनी दिलेल्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल झाला आहे.