NupurSharmaNewsUpdate : मुबई पोलीस नुपूर शर्माला ताब्यात घेण्यासाठी दिल्लीत , शोध लागेना ….

मुंबई : प्रेषित मोहम्मद यांच्यावर वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा सापडत नसल्याचे वृत्त आहे. नूपूरला आणण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक दिल्लीत असूनही त्यांचा शोध लागत नाही. महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुपूर शर्माला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत.
गेल्या ५ दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पथक दिल्लीत आहे. रझा अकादमीच्या प्रतिनिधीने दिलेल्या तक्रारीवरून भिवंडी पोलिसांनी नुपूर शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांनी पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे.
विशेष म्हणजे प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपने ५ जून रोजी देश आणि जगातील अनेक भागांत विरोध झाल्यानंतर नुपूर शर्मा यांना निलंबित केले होते. प्रेषित मोहम्मद वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनीही कठोर पावले उचलत अनेक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जे कथितपणे द्वेषयुक्त संदेश पसरवत आहेत आणि वेगवेगळ्या गटांना भडकावत आहेत. भाजपचे प्रवक्ते, एक खासदार, एक पत्रकार, सोशल मीडिया वापरकर्ते आणि धार्मिक संघटनांच्या सदस्यांच्या नावे दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांची नावे ज्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय भाजपच्या मीडिया युनिटचे निष्कासित प्रमुख नवीन कुमार जिंदाल, नुपूर शर्मा, यति नरसिंहानंद यांचीही नावे या लोकांमध्ये आहेत.